Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Goa Politics: शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनेक गोष्टींकडे सरकार दुर्लेक्ष करत आहे. त्यामुळे पोर्तुगीज परवडले पण, हे हुकूमशाही सरकार नाही.
Vijai Sardesai On BJP Govt
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: 'आत्ताच्या हुकूमशाही सरकारपेक्षा पोर्तुगीज परवडले,' अशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा भाजप सरकारवर टीका केली. मायनिंगमुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालकी हक्क अनेक वर्षापसून मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा छळ सुरु असल्याचा आरोप सरदेसाईंनी केला.

आमचो आवाज - विजय या कार्यक्रमाच्या माध्यमातून विजय सरदेसाई यांनी साखळी, वाळपई आणि डिचोली येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

'शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनेक गोष्टींकडे सरकार दुर्लेक्ष करत आहे. त्यामुळे पोर्तुगीज परवडले पण, हे हुकूमशाही सरकार नाही. शेतकऱ्यांना विविध समस्यांवर उपाय मिळविण्यासाठी मामलेदारांकडे जा, कोर्टात जा असा सल्ला दिला जातो. शेतकऱ्यांचा जो छळ सुरुये त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे,' असे आमदार सरदेसाई म्हणाले.

Vijai Sardesai On BJP Govt
Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

आमदार सरदेसाई यांनी शेतकऱ्यांसाठी अगामी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. 'लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभा हे माध्यम आहे. साखळी, वाळपई आणि डिचोली भाजपचे लोकप्रतिनिधी असलेला प्रदेश आहे. पण, येथे शेतकऱ्यांचा एकप्रकारे छळ सुरु आहे. बदल व्हायला हवा असे लोकांना केव्हा वाटतंय ते पाहुयात,' असे सरदेसाई म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com