Sadetod Nayak: विदेशात रोजगारासाठी पोर्तुगीज पासपोर्टकडे कल!

विकसित राष्ट्रांप्रमाणे दुहेरी नागरिकत्वावर विचार व्हावा: आयरिश रॉड्रिग्ज
Passport
PassportDainik Gomantak
Published on
Updated on

Sadetod Nayak: भारतीय नागरिकत्व सोडणारे बहुसंख्य गोवेकर विदेशात रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतात, याचा विचार करूनच पोर्तुगीज पासपोर्टची निवड करतात, असा सूर ‘सडेतोड नायक’ या विशेष मुलाखतीत मान्यवरांनी व्यक्त केला.

सरकारने इतर विकसित राष्ट्रांप्रमाणे दुहेरी नागरिकत्व देण्याबाबत विचार करावा, असे मत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेले आरटीआय कार्यकर्ते ॲड.आयरिश रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केले. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी मान्यवरांशी संवाद साधला.

पोर्तुगीज पासपोर्ट निवडून परदेशात जाणाऱ्या गोवावासीयांची संख्या खूप जास्त आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षी सुमारे 1265 गोवावासीयांनी भारतीय नागरिकत्व त्यागून पोर्तुगीज पासपोर्टचा पर्याय निवडला.

Passport
Pernem News: पेडणेवासींयाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटेना; बेशिस्त पार्किंग ठरतंय डोकेदुखी

गोव्यातील सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी पोर्तुगीज पासपोर्ट निवडल्यानंतर आणि त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडल्यानंतर हा मुद्दा नुकताच चर्चेत आला.

रॉड्रिग्ज यांनी पोर्तुगालमधील लिस्बन येथे झालेल्या जन्म नोंदणीबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही सांगितले. मात्र अलिकडेच त्यांनी तेथील अधिकृत नोंदी तपासल्या असता त्यांना ही बाब समजली.

त्यांनी असेही सांगितले, की पोर्तुगीज पासपोर्टमुळे व्हिसाशिवाय जवळजवळ 180 देशांमध्ये विना कटकट प्रवास करता येईल. पोर्तुगीज पासपोर्ट निवडीचा आपला निर्णय ऐच्छिक होता, कोणत्याही दबावाखाली नव्हता.

Passport
Gomantak Editorial: एकीचे बळ; ‘रेरा’चा न्‍याय

कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने आपले नागरिकत्व सोडले की नाही, हे ठरवण्याबाबत आमचे गृह मंत्रालय सक्षम दिसत नाही. रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतात,म्हणून लोक परदेशात जात आहेत, पण आपल्या देशातील प्रशासकीय व्यवस्था कोलमडत असल्याची सर्वसामान्यांची भावना आता बनली आहे.

-ॲड.क्लियोफात कुतिन्हो, सामाजिक कार्यकर्ते

आपल्या नागरिकत्वाचा मुद्दा 2020 पासून चर्चेत असून हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. जेथे फेब्रुवारी 2023 मध्ये हे प्रकरण निकाली काढून न्यायालयाने केंद्र सरकारला आपले म्हणणे ऐकण्याचे निर्देश दिले. परंतु केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपण हा प्रश्न संपवण्याचा निर्णय घेऊन पोर्तुगीज पासपोर्टचा पर्याय निवडला.

-आयरिश रॉड्रिग्ज, पोर्तुगीज पासपोर्टधारक

Passport
Power shortage In Sattari : ना पाऊस - ना वादळ; सत्तरीतील पंचायत क्षेत्रात वीजसमस्या कायम

ॲड. क्लियोफात कुतिन्हो म्हणाले की, गोवेकर अनेक वर्षांपासून पोर्तुगाल आणि इतर देशांमध्ये जात आहेत. 2006मध्ये पोर्तुगालने त्यांच्या जन्म नोंदणीबाबतचा कायदा बदलून नागरिकत्वाचा दर्जा दिला.

पोर्तुगालमध्ये त्यांचा जन्म नोंदविण्याचा आणि कोणत्याही युरोपियन संघ राष्ट्रांना भेट देण्याचा विशेषाधिकार गोव्याला देण्यात आला.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज पासपोर्ट निवडून त्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे हे गोवा सरकारपुढे सिद्ध केले आहे.

रॉड्रिग्स यांनी स्वेच्छेने पोर्तुगीज नागरिकत्व निवडले असून त्यांनी पोर्तुगीज नागरिकत्वाच्या मुद्द्यासाठी सरकारला दोष देऊ नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com