Power shortage In Sattari : ना पाऊस - ना वादळ; सत्तरीतील पंचायत क्षेत्रात वीजसमस्या कायम

वीज खाते यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास असमर्थ
Sattari News
Sattari NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात वीजसमस्या गंभीरच होत चालली आहे. पहिल्‍या पावसापासून वीज खंडित होणे नित्याचेच बनले आहे. विशेष करून नगरगाव पंचायत भागातील अनेक गावांत या समस्‍येने उग्र रुप धारण केलेले आहे. वीज बंच केबल तर त्रासादायक ठरत आहेत. नगरगाव पंचायत क्षेत्रात काल मंगळवारी दुपारपासून सायंकाळी सातपर्यंत व रात्री नऊपासून रात्रभर वीज नव्‍हती. आज बुधवारी देखील तीच स्थिती होती. त्‍यामुळे नागरिक हैराण बनले असून संताप व्यक्त करीत आहेत.

ना मोठे वादळ, ना विजेचा लखलखाट, ना ढगांचा गडगडाट तरीही सात्यत्याने वीज गायब होत आहे. नगरगाव पंचायत भागात धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, साट्रे, तार, माळोली आदी गाव तर काळोखातच असतात. वीज बंच केबल काय कामाच्या अशी संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. या वीज बंच केबल सेवेला अगदी ग्रहण लागले आहे. वीज खाते यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास असमर्थ ठरले आहे. नगरगाव-कोदाळ मार्गावरील ‘आंब्याचे मळ’ येथे वारंवार बंच केबल जळत असते. या बंच केबल्‍स कमी दर्जाच्‍या असल्‍याचा आरोप करण्‍यात येत आहे.

Sattari News
Goa Crime: हसन खान खूनप्रकरणी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल; पाचही आराेपी...

धावेचे समीर केळकर म्हणाले की, शहरात दोन मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तर लोकांना लगेच त्रास होऊ लागतो. त्यावेळी तत्काळ धावाधाव करून वीजपुरवठा सुरळीत केला जातो. पण ग्रामीण भागात मात्र लोकांनी कितीही आवाज उठविला तरी वीज खात्याकडून दुर्लक्षच केले जाते. नगरगाव पंचायत क्षेत्रात वीज बंच केबल चांगल्या दर्जाची नसल्यानेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दरदिवशी बंच केबल शॉर्ट होऊन जळत आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. सत्तरीतील वीज बंच केबल यंत्रणा कोलमडली आहे, असेही ते म्‍हणाले. मंगळवारी दुपार पासून सायं. ७.०० पर्यंत व रात्री ९.००पासून रात्रभर वीज नव्‍हती, आज बुधवारी देखील तीच स्थिती होती.

Sattari News
Goa Monsoon: गोव्यात अतिवृष्टी! गेल्या 24 तासात बरसला 133.9 मिलिमीटर पाऊस; सरासरी 349 टक्के अधिक

अभ्‍यासासाठी दिव्‍यांचा आधार

दिवसा आणि नंतर रात्रीही वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने लोकांची विशेषत: शालेय मुलांची मोठी गैरसोय होत आहे. रॉकेलच्‍या दिव्‍याच्‍या प्रकाशात त्‍यांना आपला अभ्‍यास उरकावा लागतोय. त्‍यामुळे पालकांच्‍या पूर्वीच्‍या काळातील आठवणी ताज्‍या होत आहेत. कारण त्‍यांनीही तेव्‍हा असाच अभ्‍यास केला होता. मात्र आता परिस्‍थिती बदलूनही बत्ती गुल होत असल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

शहरात दोन मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तर लोकांना लगेच त्रास होऊ लागतो. त्यावेळी तत्काळ धावाधाव करून वीजपुरवठा सुरळीत केला जातो. पण ग्रामीण भागात मात्र लोकांनी कितीही आवाज उठविला तरी वीज खात्याकडून दुर्लक्षच केले जाते. हा भेदभाव कशासाठी?

समीर केळकर, धावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com