पोर्तुगिजांनी गोव्याला लुटले, हीच वस्तुस्थिती! मुख्यमंत्री सावंत यांचे विधान

मुख्यमंत्री सावंत : आग्वाद कारागृह वस्तुसंग्रहालयाचे 1 सप्टेंबर रोजी लोकार्पण
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: श्रीमंत गोव्याला पोर्तुगिजांनी तब्बल 450वर्षे लुटले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. हा संघर्ष नव्या पिढीला माहित व्हावा यासाठी आग्वाद कारागृहात या संबंधीचे भव्य प्रदर्शन उभारण्यात येत आहे. देशाच्या अमृत महोत्सवनिमित्त संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी हे आग्वाद कारागृह वस्तुसंग्रहालय मोफत खुले ठेवले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली.

(Portuguese looted Goa, this is the fact! Statement of Chief Minister Sawant)

Goa CM Pramod Sawant
Vishwajit Rane : आधुनिक गोव्याच्या उभारणीसाठी टीसीपी कायद्यात बदल

‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. यात अनेकांना आग्वाद कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आलेले. अशावेळी या हुतात्म्यांना श्रद्धाजंली वाहत, या कारागृहाचा वारसा तसेच मुक्ती लढ्याचे ऐतिहासिक वर्णन करणारे वस्तुसंग्रहालय इथे उभे राहत आहे. येत्या १ सप्टेंबरला याचे लोकार्पण होणार’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गुरुवारी (ता.११) सायंकाळी ‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त सिकेरी येथील किल्ला आग्वाद कारागृहावर आयोजित ध्वजारोहण व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेता मायकल लोबो, मंत्री रोहन खवंटे, पोलीस महासंचालक जसपाल सिंह, आमदार गणेश गावकर हे व्यासपीठावर हजर होते. यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राया शिरोडकर (बिठ्ठोणा), श्यामसुंदर कळंगुटकर (पर्वरी), प्रभाकर नाईक (कासरपाल), सान्ताना डायस (कळंगुट), रोहिदास देसाई (पणजी) या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला.

Goa CM Pramod Sawant
Panchayat Election: गोव्यातील 21केंद्रांवर मतमोजणीला सुरूवात; 64 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड

देशासाठी प्राण नको,कल्पना द्या!

मुख्यमंत्री म्हणाले की, अमृत महोत्सवनिमित्त सरकारने काही संकल्प केले आहेत. याअंतर्गत, शाळकरी विद्यार्थी तसेच युवकांनी देशाच्या पुढील २५ वर्षांसाठी पंचाहत्तर अशी नवीन कल्पना, ठराव, क्रिया व उपलब्धी सूचवावी. आता देशासाठी प्राण देण्याची गरज नसून, नवीन कल्पना मांडण्याची गरज आहे.

आव्हानांवर मात करू : मंत्री रोहन खंवटे म्हणाले, नवीन पिढीसमोर आता हवामान बदल, कचऱ्याचा प्रश्न, पाण्याची समस्या अशी आव्हाने यापुढे येतील. एकत्रितपणे यातून आम्ही मार्ग काढू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात अनेक ऐतिहासिक स्मारके असून त्यांचेही आग्वाद कारागृहाप्रमाणे जतन झाले पाहिजे, असे मायकल लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com