Panchayat Election: गोव्यातील 21केंद्रांवर मतमोजणीला सुरूवात; 64 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड

गोव्यातील बहुतांश तालुका मुख्यालयात असलेल्या 21 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे.
Goa Panchayat Election Result
Goa Panchayat Election Result Dainik Gomantak

गोवा: गोव्यातील बहुतांश तालुका मुख्यालयात असलेल्या 21 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. 186 ग्रामपंचायतीमधून 5,038 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व 1464 प्रभागांचे निकाल सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींमधून 64 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले

(Counting of votes commences in 21 centers across Goa for panchayat election)

Goa Panchayat Election Result
Petrol Diesel Price:पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

ग्रामपंचायतींमधून 64 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले

उत्तर गोवा जिल्ह्यात 97 पंचायती असून 2,667 उमेदवार रिंगणात आहेत, तर दक्षिण गोव्यातील 89 पंचायतींसाठी 2,371 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधून 64 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, त्यापैकी 41 उत्तर गोव्यातील आणि 23 दक्षिण गोव्यातील आहेत. ही निवडणूक 10 ऑगस्ट रोजी पार पडली, ज्यामध्ये 78.70% मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या एकूण मतदारांची संख्या 6,26,496 असून त्यापैकी 2,99,707 पुरुष आणि 3,26,788 महिला होत्या.

Goa Panchayat Election Result
Goa: कर्करोग सेंटरसाठी गोवा सरकार टाटा मेमोरिअल हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करणार

मतमोजणीची ठिकाणे उत्तर गोवा : तिसवाडी : डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी. सत्तरी : कदंब बसस्थानक सभागृह, वाळपई. बार्देश : पेडे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, पेडे. पेडणे : सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय, विर्नोडा. डिचोली : नारायणे झांट्ये महाविद्यालय वाठादेव सर्वण.

दक्षिण गोवा : सासष्टी : माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारत, मडगाव. फोंडा : शासकीय आयटीआय फर्मागुढी, फोंडा. सांगे : शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, खैरीकाटे. धारबांदोडा : शासकीय कार्यालय कॉम्पल्केस, धारबांदोडा. काणकोण : मामलेदार कार्यालय, काणकोण.

केपे: शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, बोरमोळ-केपे. मुरगाव : रविंद्र भवन, मुरगाव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com