Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

Pooja Naik Interview: पुरावे पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या माझ्‍या मोबाईलमध्‍ये आहेत. परंतु, तो मोबाईल पोलिस मला परत करत नाहीत, यासारखे दावे पूजा नाईक हिने ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या मुलाखतीत केले.
Pooja Naik
Pooja NaikDainik Gomantak
Published on
Updated on

सिद्धार्थ कांबळे

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) प्रधान मुख्‍य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्‍याशी साधलेल्‍या संवादाचे सर्व पुरावे पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या माझ्‍या मोबाईलमध्‍ये आहेत. परंतु, तो मोबाईल पोलिस मला परत करत नाहीत, यासारखे महत्त्‍वपूर्ण दावे पूजा नाईक हिने रविवारी ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या मुलाखतीत केले.

तुम्‍ही मगो पक्षाच्‍या कार्यालयात काम करीत नव्‍हता, असे मगोपचे नेते सांगत आहेत. हे खरे आहे का? आणि ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात गुंतलात कशा?

२०१२ च्‍या सुमारास मी मगोपच्‍या पणजीतील दुकळे भवनमध्‍ये असलेल्‍या कार्यालयात काम करीत होते. त्‍याच काळात सरकारी खात्‍यांत मेगा भरती सुरू होणार होती. त्‍यानंतर २०१९ ते २०२२ या काळात विविध खात्‍यांमध्‍ये नोकर भरती सुरुवात झाली. त्‍यावेळी आपण लोकांकडून पैसे घेण्‍यास सुरुवात केली.

तुम्‍ही या प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर, आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) प्रधान मुख्‍य अभियंता उत्तम पार्सेकर यांची नावे घेतली आहेत. परंतु, सुदिन ढवळीकर आपला या प्रकरणाशी संबंध नसल्‍याचे सांगत आहेत. सुदिन खरे बोलत आहेत?

निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर या दोघांशी आपली ओळख सुदिन ढवळीकर यांनीच करून दिलेली होती. सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी आपण लोकांकडून पैसे घेत असल्‍याचे त्‍यांना माहिती होते. लोकांकडून घेतलेले पैसे मी निखिल देसाई आणि पार्सेकरांपर्यंत पोहोचवत होते. त्‍यानंतर ते सुदिन ढवळीकर यांच्‍यापर्यंत पोहोचत होते की नाही, ते मात्र मला माहीत नाही.

निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर या दोघांना तुम्‍ही पैसे कशा पद्धतीने देत होता? त्‍याचे काही पुरावे तुमच्‍याकडे आहेत का?

देसाई आणि पार्सेकरांना मी रोख स्वरूपात पैसे दिलेले आहेत. याबाबत त्‍यांच्‍यात आणि माझ्‍याच झालेले संभाषण मी माझ्‍या मोबाईलमध्‍ये रेकॉर्ड केले होते.

मला सुरुवातीला अटक झाली होती, तेव्‍हा तो मोबाईल डिचोली पोलिसांनी जप्‍त केला. त्‍यानंतर तो मोबाईल म्‍हार्दोळ पोलिसांकडे दिल्‍याचे डिचोली पोलिस सांगत आहेत. तर, म्‍हार्दोळ पोलिस तो मोबाईल माझ्‍याकडे दिला असे सांगत आहेत. परंतु, तो मोबाईल मला अजूनही मिळालेला नाही. त्‍यात अनेक पुरावे आहेत.

तुमच्‍या काही दाव्‍यांमध्‍ये तथ्‍य नसल्‍याचे क्राईम ब्रांचचे अधीक्षक राहुल गुप्‍ता सांगत आहेत. देसाई आणि पार्सेकर यांना ज्‍या फ्‍लॅटमध्‍ये तुम्‍ही पैसे दिले तिथे अनेक वर्षांपासून हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी राहत असल्‍याचेही त्‍यांचे म्‍हणणे आहे. याबद्दल काय सांगाल?

उत्तर : पर्वरी येथील एका फ्‍लॅटमध्‍ये स्‍थापन केलेल्‍या कार्यालयात भेटून मी देसाई आणि पार्सेकर यांना पैसे देत होते. कधी-कधी तेथे देसाई असायचे, तर कधी पार्सेकर असायचे. मी जे सांगत आहे, ते सत्‍यच आहे.

या प्रकरणाबाबत क्राईम ब्रांचने तुमची नार्को चाचणी करण्‍याचीही तयारी सुरू केली आहे. तुम्‍ही त्‍यासाठी तयार आहात का?

हो नक्‍कीच. मी जे काही सांगत आहे ते सगळे खरे आहे. मी नार्को चाचणीसाठी कधीही तयार आहे.

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात तुमचा संपर्क कधी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा भाजपच्‍या कोणत्‍या नेत्‍याशी आलेला होता का?

अजिबात नाही. सुदिन ढवळीकर, निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर या तिघांशीच याबाबत माझा संपर्क आला होता. इतर कुणाशीही आपण कधी संपर्क साधला नाही.

Pooja Naik
Pooja Naik: 'माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पालेकरांकडे फक्त मदतीसाठी गेले', पूजा नाईकचे राजकीय संबंधांवर स्पष्टीकरण

आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी तुम्‍हाला अब्रू नुकसानीबाबत कायदेशीर नोटीस बजावली आहे. ती तुम्हांला मिळाली का? आणि तुम्‍ही नोटिशीला उत्तर देणार का?

निखिल देसाईंनी मला नोटीस बजावली असल्‍याचे मला सोशल मीडियाद्वारे कळाले. ती नोटीस मला अजून मिळालेली नाही. मिळाल्‍यानंतर मी नोटिशीला नक्‍की उत्तर देणार. या प्रकरणात मला कायदेशीररीत्‍या मदत करण्‍याची हमी ॲड. अमित पालेकर यांनी दिलेली आहे. त्‍यामुळे ते मला मार्गदर्शन करतील.

Pooja Naik
Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब'चा डोंगर पोखरून उंदीरही हाती लागणार नाही, उलट 'पूजा नाईक'चा बळी दिला जाईल..

या सर्व प्रकरणाचा तुमच्‍या कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम झाला आहे?

खूप मोठा परिणाम झालेला आहे. माझी मुलगी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीत गेली होती. परंतु, तिलाही आम्‍ही घरी ठेवले आहे. तिच्‍या कॉलेजचा खर्च परवडणेही आम्‍हांला शक्‍य होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com