पणजी: गानकोकिळा तथा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त येताच दुःख झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राचे खास करून चित्रपट संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे गोवा (Goa) राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने देखील 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. (BJP Goa Lata Mangeshkar)
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मूळचे गोव्याचे. यामुळे लतादीदींचे गोव्याशी कौटुंबिक नाते होते. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील कैक पिढ्या विसरता येणार नाहीत. वडील दीनानाथ यांच्या अकाली निधनानंतर लतादीदींनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली.
सुमारे 60 दशके संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवलेल्या लतादीदी काही दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुबंईतील (Mumbai) ब्रीच कॅंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.