Vsaco
VsacoDainik Gomantak

Vasco : पत्रकार परिषदेत तक्रारदाराला चपलांचा हार घालणार अटकेत; हल्ला केल्याचा आरोप

वास्को येथील रामनाथ देवस्थान मंदिर अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला
Published on

मुन्नालाल रामचंद्र हलवाई यांनी वास्को येथील रामनाथ देवस्थान मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करत सौरभ लोटलीकर यांनी यांनी घर बांधले असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याबाबत हलवाई हे पणजी, आझाद मैदानावर पत्रकारांना माहिती देत असताना एका व्यक्तीने हलवाई यांना कॅमेऱ्यासमोरच चपलांचा हार घातला व तोंडाला काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याच व्यक्तीने माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप हलवाई यांनी केला आहे. यावरुन एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे

(Ponda police arrested Bhumi Varak at Khandepar for allegedly attacking Munnalal Halwai)

Vsaco
Panjim : पणजी येथील हार्डवेअर गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

मिळालेल्या माहितीनुसार रामनाथ देवस्थान मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार हलवाई यांनी केली आहे. यावरुनत हलवाई यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी भूमी वरक (35 वर्षे) रा. खांडेपार याला ताब्यात घेतले आहे.

सौरभ लोटलीकर यांनी रामनाथ देवस्थान मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करत घर बांधले असल्याची तक्रार मुन्नालाल रामचंद्र हलवाई यांनी केली आहे. याची माहिती पत्रकार परिषदेत देत असताना संशयित भूमी वरक याने हलवाई यांच्या तोंडाला काळे फासले होते. तसेच याच व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप होत असल्याने वरक याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Vsaco
Vasco : अतिक्रमणाविरोधात बोलणाऱ्याला भर पत्रकार परिषदेत घातला चपलांचा हार; ''हल्लेखाेराला पोलिस पाठीशी घालत आहेत''

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने तक्रारदाराला कॅमेरासमोरच काळे फासत अपमानास्पद कृत्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातच तक्रारदार हलवाई यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केल्याने कारवाई म्हणून ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com