Vasco : अतिक्रमणाविरोधात बोलणाऱ्याला भर पत्रकार परिषदेत घातला चपलांचा हार; ''हल्लेखाेराला पोलिस पाठीशी घालत आहेत''

वास्को येथील रामनाथ देवस्थान मंदिरालगत अतिक्रमण केल्याचा आरोप
Vsaco
VsacoDainik Gomantak

मुन्नालाल रामचंद्र हलवाई यांनी वास्को येथील रामनाथ देवस्थान मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करत सौरभ लोटलीकर यांनी यांनी घर बांधले असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याबाबत हलवाई हे पणजी येथील आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेत माहिती देत असताना अज्ञात व्यक्तीने हलवाई यांना कॅमेऱ्यासमोरच चपलांचा हार घातला व तोंडाला काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

(Munnalal Halwai has complained today that he has built a house encroaching on the site of Ramnath temple in Vasco)

मिळालेल्या माहितीनुसार सौरभ लोटलीकर यांनी रामनाथ देवस्थान मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करत घर बांधले असल्याची तक्रार मुन्नालाल रामचंद्र हलवाई यांनी केली आहे. याची माहिती पत्रकार परिषदेत देत असताना अज्ञात व्यक्तीने कॅमेरासमोरच हलवाई यांना चपलांचा हार घालत तोंडाला काळे फासले. आणि तेथून ती व्यक्ती निघून गेली.

Vsaco
Mopa Airport : ठरलं! मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 'या' नावावर शिक्कामोर्तब

काळे फासत निघून गेल्यानंतर हलवाई यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटले की, काळे फासणाऱ्या व्यक्तीने सौरभ लोटलीकर याच्या सांगण्यावरुन हा प्रकार केला आहे. तसेच काळे फासणारा देखील भाजपचा कार्यकर्ता आहे. याच व्यक्तीने आपल्याला काही दिवसांपुर्वी लोंखडी गज मारला आहे. तरी देखील पोलीस यांच्यावर कारवाई करत नाहीत, कारण लोकांना हे भीती दाखवतात असे हलवाई यांनी सांगितले.

Vsaco
Goa Music Festival: गोव्यात अलौकिक कलेची संस्कृती अन् भारतीय संगीतात भोग नव्हे योगाला महत्त्व!

पोलिसांच्यासमोर माझ्यावर हल्ला केला गेला तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. याचा अर्थ काय? सरळ सरळ हे लोकांना भीती दाखवतात आणि भाजपचे कार्यकर्ते असल्याने यांना वरदहस्त असल्याने असे धाडस त्यांच्याकडून होत असल्याचं हलवाई यांनी म्हटले आहे.

संबधित व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अतिक्रमण केले अथवा न केले हा मुद्दा अद्याप न्यायलयात जाणार असला तरी एखाद्याला काळे फासत अरेरावीची भाषा करणे याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com