Ponda Murder Case: दारुच्या नशेत पत्नीचा खून केला, मृतदेह मंदिराजवळ ठेवला; पण तोवर...

बाणास्तारी येथील घटना
Husband killed wife
Husband killed wife Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Murder Case: बाणास्तारी येथे पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी त्योफिल लकारा 43, रा. छत्तीसगड) याला अटक केली आहे. मेलो लकारा असे मृतेचे नाव आहे.

संशयित त्योफीलने पत्नी मेलो लकारा हिला मारहाण करून तिचा गळा आवळून खून केला. शनिवारी या पती-पत्‍नीने मद्यप्राशन केले होते.

त्यानंतर त्यांचे जोरदार भांडण झाले. त्‍या रागातच त्योफीलने मेलो हिचा गळा आवळला व त्यात तिचा मृत्यू झाल्याची कबुली पतीने पोलिसांना दिली.

Husband killed wife
Atal Setu Reopens: अटल सेतू वाहतुकीसाठी अखेर खुला; कोंडीपासून वाहनचालकांना दिलासा

मृत्यू दाखल्यासाठी भटकंती

खून केल्यानंतर त्योफीलने मेलो हिला तेथीलच एका मंदिराच्या शेजारी ठेवले. त्यानंतर तो तिच्या मृत्यू दाखल्यासाठी भटकत होता. पण पोलिसांना एक महिला निपचित पडल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तिला बेतकी आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. फोंडा पोलिसांनी त्योफील याला अटक केली असून त्याने आपल्‍या कृत्‍याची कबुली दिली आहे.

Husband killed wife
Amit Shah In Goa: लोकसभेच्‍या दोन्‍ही जागांवर यश द्या; अमित शहांची साद

अपघातात युवक ठार

वाळपई नगरगाव मार्गावर आज रविवारी सायंकाळी झालेल्या स्वयंचलीत दुचाकी अपघातात रवी लिंगाप्पा दोडामनी (23, रा. जुने गोवे) या युवकाचा मृत्यू झाला.

दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच असलेल्या जागेत धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. यातच त्याचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pradeep Yadav Bail Rejected
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Goa Tourist Murder Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com