Hair Growth Tips: हेल्दी अन् चमकदार केस हवेत? मग आजच करा 'हे' काम

तुम्हाला तुमच्या केसांना हेल्दी आणि चमकदार बनवायचे असेल तर प्लॅस्टिकचा कंगवा वापरणे टाळावे.
 Hair Growth Tips
Hair Growth Tips Dainik Gomantak

Hair Growth Tips: अनेकांना केस गळण्याची समस्या असते. यासाठी अनेक उपाय तुम्हा केले असतील पण पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नसेल.

ही समस्या तुमच्या प्लास्टिकच्या कंगव्यामुळे तर होत नाही ना? जर तुम्हाला तुमचे केस नेहमीसारखे निरोगी आणि चमकदार हवे असतील तर प्लास्टिकचा कंगवा वापर सोडा आणि लाकडी कंगवा वापरणे सुरू करा.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिकऐवजी लाकडी कंगवा का वापरावा आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेउया.

  • केसांची वाढ

प्लास्टिकच्या कंगव्यापेक्षा लाकडी कंगव्याचा वापर जास्त केल्याने केसांची वाढ चांगली होते. त्यामुळे केसांच्या मुळांना मसाज मिळते आणि त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात.

  • कोंड्याची समस्या कमी होते

केसांमध्ये कोंड्याची समस्या अधिक जाणवते. डोक्यातील कोंडा फक्त केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यापासून रोखत नाही तर त्यांना कमकुवत देखील बनवतो. पण लाकडी कंगव्याचे मऊ, गोलाकार दात स्काल्पला आराम देतात.

केसांमध्ये घाण जमा होण्यापासून रोखतात. त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता कमी होते. दुसरीकडे, प्लास्टिकचा कंगवा वापरताना, प्लास्टिक चार्जमुळे घाण देखील केसांना चिकटते.

Hair Growth Tips
Hair Growth TipsDainik Gomantak
 Hair Growth Tips
Vastu Tips Kitchen: 'या' वस्तु हातातून खाली पडणं मानलं जातं अशुभ
Sunday Tips| Hair Care Tips
Sunday Tips| Hair Care Tips Dainik Gomantak
  • नैसर्गिक चमक

लाकडी कंगवा वापरल्याने केसांचा गुंता कमी होतो. त्यांना नैसर्गिक चमक देतो. नैसर्गिक सामग्रीपासून बनविलेले, लाकडी कंगवामुळे ऍलर्जी किंवा त्वचेच्या कोणत्याही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही तर प्लास्टिकच्या कंगव्याचे हे तोटे आहेत.

  • ऑइल केसांच्या मुळात चांगल्या प्रकारे पोहचते

लाकडी कंगवा स्काल्पचे नैसर्गिक तेल संपूर्ण केसांमध्ये सहजपणे पोहचते. प्लॅस्टिकच्या कंगव्यामध्ये आधीच घाण साचलेली असते, ज्यामुळे केसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com