Ponda Market: फोंडा पालिकेचा कारवाईचा दणका! थकीत भाडेप्रश्नी 21 दुकाने सील; 2 कोटींच्या महसुलाचा प्रश्‍न

Ponda Market Shop Sealed: फोंडा पालिकेच्यासंकुलातील एकूण सव्वीस दुकानदारांनी आपले भाडे भरले नव्हते. पालिकेला सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त महसुलाला मुकावे लागले होते.
Ponda Market Shop Sealed
Ponda Market Shop NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Rent issues in Ponda Market

फोंडा: फोंडा पालिकेच्या वरचा बाजार भागातील मार्केट संकुलातील २४ पैकी २१ दुकानांवर कारवाई करीत फोंडा पालिकेने आज (सोमवारी) ही दुकाने सील केली. उर्वरीत दुकाने उद्या सील केली जातील.

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ या दुकानदारांनी आपले भाडे पालिकेत भरणा केले नव्हते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दुकानांचे भाडे भरले नव्हते, असा दावा दुकानदारांनी केला आहे; पण दुकाने सील करीत असताना तीन दुकानदारांनी भाडे भरण्याची तयारी केली होती.

फोंडा पालिकेच्या वरचा बाजार भागातील मार्केट संकुलातील एकूण सव्वीस दुकानदारांनी आपले भाडे भरले नव्हते. बराच काळ भाडे थकीत राहिल्याने पालिकेला सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त महसुलाला मुकावे लागले होते.

वास्तविक हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते; पण दुकानदारांनी कायद्यानुसार आपले भाडे भरणे आवश्‍यक असल्याचा दावा करीत फोंडा पालिकेने या थकीत भाडेकरूंना दणका देत आज ही दुकाने सील करण्याची धडक मोहीम राबवली. फोंडा पालिकेत आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईवेळी दुकानदारांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र दिसत होते.

दरम्यान, भाडे भरा आणि दुकानांचे सील काढा, असा पवित्रा फोंडा पालिकेने घेतला असून पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी थकीत भाड्यांचा प्रश्‍न प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. त्यामुसार पालिका अभियंता विशांत नाईक व इतर अधिकाऱ्यांनी फोंड्यात अशा दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईच्या सत्रामुळे बहुतांश थकीत भाडे भरण्याकडे दुकानदारांनी कल ठेवला असल्याने पालिकेची तिजोरी सध्या भक्कम होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Ponda Market Shop Sealed
Panaji Market: मांस विक्रेत्यांसोबत दुजाभाव का, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? गोवा खंडपीठाचा पणजी महापालिकेला प्रश्न

२४ दुकानदार दोषी...

फोंडा पालिकेच्या मार्केट संकुलात असलेले एकूण २४ दुकानदारांनी भाडे भरले नव्हते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ हे भाडे थकीत राहिले आहे, त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल पालिकेला मुकला होता. कारवाई केलेल्या दुकानदारांपैकी अकरा लाख रुपये सर्वांत जास्त भाडे आहे. कारवाई केलेल्या दुकानांच्या शटरवर नोटीस चिकटवण्यात आली आहे. सर्व दुकाने चालू स्थितीत होती.

या दुकानात घाऊक माल विक्री करणाऱ्या तसेच हेअर कटींग सलून, बार तसेच कपडे व इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश आहे. दुकाने सील करण्यासाठी आल्यानंतर काही दुकानदारांनी भाडे भरण्याची तयारी केली, त्यानुसार काहीजणांनी धनादेशही पालिकेच्या नावे काढले, त्यामुळे २४पैकी तीन दुकानदार कारवाईपासून बचावले.

Ponda Market Shop Sealed
Ponda Job Alert: फोंडा पालिकेत भरली जाणार विविध पदे! नवीन इमारत, सीसीटीव्हीवरती बैठकीत चर्चा

कारवाई करायला आले अन्...

फोंडा पालिकेच्या मार्केट संकुलातील थकीत दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना पाहून फुटपाथवर सामानहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी घाबरूनच पळ काढला. या कारवाईमुळे दुकानांच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दुकानदारांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायदेशीर बाजूंकडे पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com