Ponda Lok Sabha election : लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

काँग्रेस-आप सक्रिय : नगरपालिका निवडणुकीचे पडसाद कायम, मगो भाजपसोबत
Ponda Municipal Council Election
Ponda Municipal Council ElectionGomantak Digital Team

Ponda Lok Sabha election : फोंड्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. फोंडा तालुक्यातील फोंडा, मडकई व शिरोडा हे तीन मतदारसंघ दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात असून प्रियोळ मतदारसंघाचा समावेश उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात केला आहे. या चार मतदारसंघापैकी फोंडा, शिरोडा व प्रियोळ हे तीन मतदारसंघ भाजपकडे असून मडकई मतदारसंघावर मगो पक्षाचे राज्य आहे.

पण सध्या मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर हे सरकारात वीजमंत्री असल्यामुळे त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत भाजपला होऊ शकतो. त्यामुळे वर वर पाहिल्यास या चारही मतदारसंघात भाजपला भरपूर आघाडी मिळायला हवी, असे चित्र दिसते आहे.कर्नाटकाच्या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाल्यामुळे वाऱ्याची दिशा बदलल्याचे स्पष्टपणे दिसायला लागले आहे. काँग्रेस, आपचे नेते सक्रिय झाले आहेत.

Ponda Municipal Council Election
Ponda News : स्थानिक युवकांना नोकरीत मिळावे प्राधान्य!

खास करून फोंडा मतदारसंघात हा बदल प्रकर्षाने जाणवायला लागला आहे. या मतदारसंघात मुस्लिम व कॅथलिक समाजाची आठ हजाराहून अधिक मते असून ती यावेळी काँग्रेसच्या पारड्यात पडू शकतात. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत यातली काही मते म. गो. पक्षाकडे वळली होती. त्याचा परिणाम फोंडा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर यांच्यावर झाला होता.

अर्थात अल्पसंख्याकांची मते म. गो.कडे वळवण्यात उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचा ''करिष्मा'' कारणीभूत होता, यात शंकाच नाही. पण लोकसभा निवडणुकीत म. गो. चा उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता नसल्यामुळे ही मते परत एकदा काँग्रेसकडे वळू शकतात. त्यात परत फोंडा मतदारसंघात कर्नाटकचे बरेच लोक वास्तव्याला असल्यामुळे त्याचाही फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

Ponda Municipal Council Election
Ponda News : ...फोंड्यात खोदकाम सुरुच!

शिरोडा मतदारसंघात आप व काँग्रेस एकत्र आल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकेल. मडकई मतदारसंघाचे सुकाणू वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हातात असल्यामुळे ते या मतदारसंघाची दिशा ठरवू शकतात. पण फोंडा हा सर्वात गुंतागुंतीचा मतदार संघ ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या फोंडा पालिका निवडणुकीचे पडसादही लोकसभा निवडणुकीत उमटू शकतात.

काँग्रेस-आप एकत्र येणार?

सध्या देशभर विरोधी पक्षांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू असून हा प्रयत्न यशस्वी झाल्यास गोव्यातही त्याचे परिणाम दिसू शकतात. दक्षिणेत आपची बरीच शक्ती असून ही शक्ती काँग्रेस बरोबर एकवटल्यास फोंडा तालुक्यातील शिरोडा व फोंडा हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे जाऊ शकतात. आता विरोधी पक्षाचे एकत्रीकरण होते, की नाही यावर लोकसभा निवडणुकीतील बरीच समीकरणे अवलंबून असणार आहे.

Ponda Municipal Council Election
Ponda News: दाभाळमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष; सुपारीचे पीक धोक्यात

पालिका निवडणुकीचे पडसाद

नगराध्यक्ष निवडणुकीत गुप्त मतदान झाले असते, तर काय झाले असते, या बाबींवर चर्चा रंगत आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीवर डोळे ठेवून बसलेले काही नगरसेवक संधीची वाट पाहात आहेत. पालिका निवडणुकीतील भाजपच्या यशापयशाचा आढावा घेऊन तसेच निकालानंतर उद्‍भवलेल्या परिस्थितीचे अवलोकन करावे, नाही तर त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो, असे काहींचे मत आहे.

भाटीकरांची भूमिका महत्त्वाची

फोंडा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपला आघाडी मिळते की काय? हे काही अंशी नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बऱ्यापैकी यश प्राप्त केलेल्या ''रायझिंग फोंडाचे'' नेते डॉ. केतन भाटीकर यांच्यावरही अवलंबून असणार आहे. या पालिका निवडणुकीत भाजपशी एक हाती लढत दिल्यामुळे भाटीकरांचे ‘वजन’ बरेच वाढल्याचे प्रत्ययाला यायला लागले आहे.

Ponda Municipal Council Election
Ponda Bus Stand: फोंड्यातील कदंब बसस्थानकाचे काम अद्याप रखडलेलेच, सर्व भार जुन्या बस स्टॅन्डवर

रवी नाईकांची प्रतिष्ठा पणाला

फोंडा पालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश न मिळाल्यामुळे अनेक प्रश्नचिन्हे उभी झाली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या कुर्टी -खांडेपार पंचायतीच्या निवडणुकीतही भाजपला समाधानकारक यश मिळाले नव्हते. पण आता काँग्रेसशी संगनमत करून भाजपने ही पंचायत आपल्या कब्जात आणली आहे. पण लोकसभा निवडणुकीत या समीकरणाचा फायदा होईल की नाही? हे सांगणे कठीण आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com