Ponda News : ...फोंड्यात खोदकाम सुरुच!

वाहतुकीला अडथळा : शहरात मॉन्सूनपूर्व कामेही प्रलंबित
Ponda News
Ponda NewsGomantak Digital Team
Published on
Updated on

फोंडा : पावसाळा दरवाजा खटखटावत असूनसुद्धा फोंड्यातील खोदकामे बंद होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. वेगवेगळ्या कारणावरून ही खोदकामे केली जात असून पावसाळा उंबरठ्यावर आला असताना आताच ही खड्डे खोदण्याची कामे का सुरू केली? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. खोदकामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून धूळ प्रदूषणाचा धोकाही वाढला आहे.

शहराच्या मध्य भागाला सुद्धा या खोदकामापासून सुटका मिळालेली दिसत नाही. दादावैद्य चौक ते बांदोडकर इमारत या साधारण अर्धा किलोमीटरच्या परिसरात सात ते आठ खड्डे खोदलेले आहेत. हा शहराचा मुख्य रस्ता असल्यामुळे येथे वाहतुकीचे प्रमाण नेहमीच जास्त असते. हे खड्डे बुजवले तरी माती रस्त्यावर पसरणार असल्यामुळे त्याचा त्रास दुचाकीस्वारांना पावसाळ्यात होण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

Ponda News
Ponda News: दाभाळमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष; सुपारीचे पीक धोक्यात

गटारांचे काम अर्धवट

फोंडा बाजार हा शहरातील सर्वात महत्त्वाचा भाग. येथे पालिका निवडणुकीची आचारसंहिता असताना गटर्स उपसण्याचे काम सुरू होते. पण हे काम पूर्णत्वास न नेता बंद करण्यात आले. गेली दोन-तीन वर्षे ही गटर्स सारखी उपसली गेली नसल्यामुळे पावसाळ्यात नजीकच्या घरात पाणी शिरले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होती की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही भीती प्रत्यक्षात येण्यापूर्वी नगरपालिकेने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरिक व विक्रेते यांनी केली आहे.

Ponda News
Ponda News: पाणी टंचाईवर मात करत 'हा' अनोखा प्रयोग करून त्यांनी फुलविली बागायती

बांदोड्याचा रस्ता ‘मातीमय’

कदंब बस स्थानकाच्या विरुद्ध बाजूला असलेला बांदोड्याकडे जाणारा भाऊसाहेब बांदोडकर मैदानापर्यंतचा रस्ता मातीमय झाल्याचे दिसून येत आहे. केबल घालण्याकरता या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे खोदण्यात आले होते.

हे खड्डे जरी बुजवण्यात आले असले तरी त्याच्या खुणा मातीच्या व ढिगाऱ्याच्या रूपाने अजूनही दृष्टीस पडत आहेत. लवकरात लवकर जर या रस्त्याचे डांबरीकरण केले नाही, तर पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती अधिक बिकट होऊ शकते.

Ponda News
Ponda : कुर्टीत साकारणार नवीन पंचायतघर - रवी नाईक

हा जरी ग्रामीण भागातला रस्ता असला तरी येथे वस्ती वाढत असल्यामुळे वाहतूकही वाढायला लागली आहे. त्यामुळे याचा त्रास वाहनधारकांनाच नव्हे, तर इथे राहणाऱ्या नागरिकांना भोगायला लागत आहे. त्यामुळे विना विलंब या मातीमय झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिक व वाहन चालकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com