Ponda News
Ponda News Dainik Gomantak

Ponda News : मुसळधार पावसाने वाढविली फोंडावासीयांची व्यथा ; वीज-पाणी गायब

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांची त्रेधातिरपीट; सरकारची लक्तरे वेशीवर
Published on

मिलिंद म्हाडगुत

Ponda News : "‘नेमेची येतो मग पावसाळा, सृष्टीचे हे मर्म तू जाण बाळा’ अशी एक जुनी कविता आहे. याचा अर्थ असा की पावसाळा हा नेहमीप्रमाणे येणारच पण त्याकरता आपण तयार असायला पाहिजे. पण गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ज्या रितीने शासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत ते पाहता शासनाला हा पाऊस नवीन असल्यासारखा वाटायला लागले आहे.

फोंडा नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी गटार न उपसल्यामुळे रस्त्यावर पाणी यायला लागले आहे. यामुळे फोंडा बाजारातील काही घरांत पाणी शिरलेले बघायला मिळत आहे. शहरातील काही हॉटमिक्सिंग केलेल्या रस्त्यांचीही या पावसाने दैना करून टाकली आहे. रस्त्यावरचे काही खड्डे योग्यरीत्या न बुजवल्यामुळे त्यात पाणी साचले असून त्याचा त्रास वाहनचालकांना व खासकरून दुचाकीचालकांना होताना दिसत आहे.

Ponda News
Goa News : गोवा सरकारचा कंपन्यांना दिलासा; 'त्या' निर्णयाचे फार्मा कर्मचाऱ्यांकडून स्‍वागत

दुर्गंधी पसरली

काही ठिकाणी नगरपालिकेने कचऱ्याची व टाकाऊ साहित्याची उचल न केल्यामुळे पावसाचे पाणी पडून त्याला दुर्गंधी यायला लागली आहे. फोंडा बाजारातील मार्केट प्रकल्पाच्या समोर फेकलेल्या काही बाटल्या व इतर साहित्यावर पावसाचे पाणी पडल्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. बाजारात नागरिकांची जास्त ये-जा असल्यामुळे ही दुर्गंधी रोगराई पसरवू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

Ponda News
Goa Theft Case : चार कोटींचे सोने आणि चार चोर; थरारनाट्यानंतर चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

रोगांचा शिरकाव

गटाराचे पाणी घरात शिरत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांचा शिरकाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना मज्जातंतूचे विकार जडू शकतात. एकंदरीत सध्या पडणाऱ्या पावसाने शासनाचा गलथान कारभार उघड केला असून त्याचे बळी मात्र सामान्य नागरिक ठरायला लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com