Goa Theft Case : चार कोटींचे सोने आणि चार चोर; थरारनाट्यानंतर चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्यातून कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई
Goa Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Theft Case : धावत्या रेल्वेत ४ कोटींच्या सोन्याची चोरी करणाऱ्या ४ आंतरराज्य चोरट्यांना कोकण रेल्वे पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर आता त्यांनी विकलेले १२ लाखांचे आणखी सोने पोलिसांनी मुंबईतील झवेरी बाजार येथून जप्त केले आहे. या पूर्वी या टोळीकडून १ कोटींचे सोने जप्त करण्यात आले होते. महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्यातून कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई करून रेल्वेतील चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या चार संशयितांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे १ कोटींचे सोने व ५० हजारांची रोकड जप्त केली होती.

काणकोण येथील रेल्वेस्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना २ मे २३ रोजी ४ कोटींचे ७ किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग या टोळीने लंपास केली होती. या दरम्यान, संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर. यांनी या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसात तक्रार नोंदवली होती. कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी मडगाव पोलिस निरीक्षक सुनील गुडलर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन पथके स्थापन करून कर्नाटक व महाराष्ट्रात स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास केला.

Goa Theft Case
Goa Monsoon 2023: राज्‍यभरात पावसाचे थैमान; झाडे, दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

यानंतर सांगली येथून संदीप भोसले (४०, रा. कवठे महांकाळ) व अक्षय चिनवल (२८, मूळ रा. खानापूर) या दोघांना २८ जून रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शेवोर्लेट क्रुझ व मारुती रित्झ या दोन कार जप्त केल्या तसेच दोन महागडे मोबाईल हस्तगत केले होते.

अर्चनाने माहिती दिल्याचे उघड

चौकशीत अर्चना मोरे (४२, रा. तळोजा, नवी मुंबई) हिचे नाव पुढे आले. दागिने नक्की कधी येणार याची माहिती अर्चना मोरे यांनी संशयित संदीप भोसले व अक्षय चिनवल यांना दिल्याचे पुढे आले. त्यानुसार चारही जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुंबई येथून १२ लाखांचे चोरीचे सोने ताब्यात घेण्यात मडगाव कोकण रेल्वे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर, पोलिस कॉन्स्टेबल अमरदीप चौधरी व समीर शेख यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com