Ponda Garbage Issue : तांबडीसुर्लच्या 16 गाडेधारकांना नोटीस

साकोर्डा पंचायतीची कारवाई : महादेव मंदिर परिसर अस्वच्छ केल्याचा ठपका
Ponda Garbage Issue
Ponda Garbage Issue Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Garbage Issue : साकोर्डा पंचायतीने तांबडीसुर्ला येथे असलेल्या 16 गाडेधारकांना कचरा पसरवून पर्यटनस्थळाचा परिसर अस्वच्छ करत असल्याचा दावा करून कारवाईसंदर्भात नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे गाडेधारकांनी पंचायतीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.रोजगार नसल्याने व आर्थिक दुर्बल असल्याने पंचायतीने आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार धारबांदोडा तालुक्यातील तांबडीसुर्ला येथील जगप्रसिद्ध महादेव मंदिराजवळच्या गाडेधारकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात कचरा होत असल्याने स्थानिक पंचायत मंडळाने गाडे धारकांना नोटीस पाठवून यापुढे दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र,

परिसरात असलेल्या रानटी मर्कट( खेती) रात्री कचरापेटीत कुलूप नसल्याने कचरापेटीतील कचरा बाहेर विखरून टाकत आहे, त्यामुळे हा परिसर विद्रूप होत आहे,असा दावा करून स्थानिक पंचायत मंडळ व आमदारांनी आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी गाडेधारकांनी केली.

Ponda Garbage Issue
Ponda Water Issue: फोंडा तालुक्यात जुन्या समस्या कायम; जलसाठा घटतोय!

राज्यातील खाणी बंद झाल्यापासून स्थानिकांवर आर्थिक संकटात दिवस काढावे लागले. त्यामुळे पर्यटनस्थळ असलेल्या तांबडीसुर्ला मंदिर परिसरात गाडे घातल्यास उदरनिर्वाह चालेल, असे समजून या ठिकाणी स्थानिकांनी गाडे उभारले. स्थानिकांचा उदरनिर्वाह येथे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. मंदिरात सुटीच्या दिवसात अधिक प्रमाणात पर्यटक येत असल्याने स्थानिकांचा व्यवसाय तेजीत येतो.

मर्कटलिलांमुळे कचरा; दिलासा द्या !

गाडे धारक प्रतिवर्षी 120 रुपये पंचायतीला कचराकर देतात.कचराकुंडी कमी पडत असल्याने आमदार डॉ.गणेश गांवकर यांच्या सहकार्याने या ठिकाणी कुलूप असलेल्या आणखी कचरा पेटी देण्यात येणार आहेत. हा परिसर सदैव स्वच्छ ठेवण्यासाठीही पंचायत प्रयत्नशील आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे.

- प्रिया खांडेपारकर, सरपंच साकोर्डा.

Ponda Garbage Issue
Ponda Cemetery : फोंड्यातील मुक्तिधाम टाकतेय कात!

या परिसरात साफसफाई करून आम्हीसर्व गाडेधारक कचरा कुंडीत टाकतात.तसेच हा परिसरही स्वच्छ ठेवतात पण पंचायत कचरा उचलण्यास उशीर करीत आहेत. दर आठवड्याला हा कचरा उचलावा तसेच या ठिकाणी कचरा पेटी कमी पडत आहेत तेव्हा कुलुप लावलेल्या कचरा पेट्या आम्हाला द्याव्यात.

- आनंद गावकर, गाडेधारक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com