Ponda Water Issue: फोंडा तालुक्यात जुन्या समस्या कायम; जलसाठा घटतोय!

चिंतेची बाब; दूधसागरवरील दोन बंधाऱ्यांवरच ‘ओपा’ची भिस्त
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

दरवर्षीप्रमाणे मार्च महिना लागला की फोंडा तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावते. यंदाही ही समस्या कायम असून पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा खात्याने टँकरची व्यवस्था केली असली तरी आता ज्या ओपा जलप्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या जलप्रकल्पातील पाणी साठा कमी होत असल्याने चिंतेची बाब ठरली आहे. सध्या तरी दूधसागर नदीवरील बंधाऱ्यांवरच या ओपा जल प्रकल्पाची भिस्त राहिली आहे.

Ponda News
Goa Municipal : वाळपई पालिका उद्यानामागील परिसर गलिच्छ

फोंडा तालुक्यात बेतोडा, शिरोडा, प्रियोळ, उसगाव, खांडेपार आणि केरी भागात पाण्याचा तुटवडा ऐन उन्हाळ्यात भासतो. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनाही केली जाते, पण नेहमीच्या या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे.

जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी

राज्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. राज्यात भरपूर पाऊस पडतो, पण हा पाऊस वाहून वाया जात असल्याने हे पाणी अडवून जर त्याचा योग्य उपयोग झाला तर राज्यातील पाणी पुरवठ्याची समस्या कायमची निकाली निघू शकते.

- रामदास जना नाईक (ढवळी - फोंडा)

देशात इतर राज्यात पडत नसेल एवढा चांगला पाऊस गोव्यात पडतो. पण या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही, त्यातच गोव्यात घरबांधणीचेही नियोजन नाही. जागा मिळेल तेथे डोंगरांवर घरे बांधली जातात, आणि मग पाण्यासाठी धावपळ केली जाते, त्यामुळे नियोजन हे महत्त्वाचे ठरले आहे.

- सूरज शिवा गावकर (तिस्क - उसगाव)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com