Ponda Cemetery : फोंड्यातील मुक्तिधाम टाकतेय कात!

नगराध्यक्षांचा पुढाकार : नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात, एक कोटी १९ लाख रुपये खर्च
Ponda Cemetery
Ponda CemeteryGomantak DIgital Team
Published on
Updated on

Ponda Cemetery : स्मशानभूमी म्हटले, की कोणाच्याही छातीत धस्स होतेच. पण जन्माला आला तो शेवटी जाणार हे निश्‍चित असल्याने स्मशानभूमी अर्थातच मुक्तिधाम ही महत्त्वाची बाब ठरते. मात्र शेवटच्या प्रवासाला निघताना संबंधित व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवार यांना अंत्यसंस्कार करताना तरी निदान चांगल्या सुविधा मिळणे आवश्‍यक आहे, आणि नेमका हाच विचार करून फोंडा पालिकेने वारखंडे - फोंडा येथील मुक्तिधामाच्या नूतनीकरणाच्या कामाला चालना दिली आहे.

गेल्या १९ मार्चला या कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि प्रत्यक्ष कामाला सुरवातही करण्यात आली, त्यामुळे नजीकच्या काळात एक सुविहित आणि चांगली सुविधा देणारे मुक्तिधाम फोंडावासीयांना मिळेल हे नक्की. या मुक्तिधामाच्या नूतनीकरणासह आवश्‍यक सुविधा प्रदान करण्याच्या या कामासाठी फोंडा पालिकेतर्फे एकूण १ कोटी १९ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Ponda Cemetery
Ponda Water Issue: फोंडा तालुक्यात जुन्या समस्या कायम; जलसाठा घटतोय!

तत्कालीन फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष राधिका नाईक व उपनगराध्यक्ष आरविन सुवारिस यांच्या व इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत हे उद्‍घाटन झाले होते. पण नंतरच्या काळात या मुक्तिधामाचे नूतनीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे या स्मशानभूमीतील सोयी सुविधांचे तीन तेरा वाजले होते.

आता फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच इतर नगरसेवकांनी फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांच्या सहकार्याने या मुक्तिधामाचे नव्याने नूतनीकरण व इतर सुविधा देण्यासाठी काम सुरू केले असून नजीकच्या काळात अद्ययावत सुविधांनी युक्त आणि अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना सुसह्य ठरेल, असे मुक्तिधाम उपलब्ध होणार आहे.

पहिल्या दोन कोविड बळींवर फोंड्यात झाले अंत्यसंस्कार

राज्यात कोविडची महामारी आल्यानंतर मोठा हाहःकार उडाला. या महामारीमुळे बळीही गेले, पण या कोविडबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे हा सवाल निर्माण झाला. त्यावेळेला फोंडा पालिकेच्या या मुक्तिधामात सर्व सोपस्कार पूर्ण करून या दोन्ही कोविडबाधीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, आणि नंतर मग इतर स्मशानभूमीत परवानग्या देण्यात आल्या.

विशेष म्हणजे राज्यातील बेवारस आणि अन्य धर्मीयांवर देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी या मुक्तिधामात जागा राखून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे कुणाचीच अडचण होणार नाही, याची खबरदारी फोंडा पालिकेने घेतली आहे.

बायोमास गॅसीफायर काळाची गरज

फोंड्यातील या मुक्तीधामात विजेवर चालणारे बायोमास गॅसीफायर ही काळाची गरज बनली आहे. देशातील मोठ्या शहरात ही सुविधा आहे. पुढील काळात लाकुड उपलब्ध होणे कठीण होणार असल्याने शेवटी विजेवर चालणारी स्मशानभूमीच सगळीकडे बसवण्यात येईल, हे नक्की. पण त्याचा शुभारंभ २००२ साली तत्कालीन खासदार रमाकांत आंगले यांनी केली होती.

Ponda Cemetery
Ponda News : ओपा जल प्रकल्पाची भिस्त बंधाऱ्यांवर!

सुमारे बारा लाख रुपये खर्चून हा बायोमास गॅसीफायर बसवण्यात आला, पण लोकांच्या पचनी ही पद्धती पडली नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास मृतांच्या नातेवाईकांनी नकार दिला. केवळ एकच बेवारस मृतदेह या विजेच्या मशिनमध्ये दहन करण्यात आला, त्यानंतर हे मशीन तसेच पडून राहिले आणि नंतरच्या काळात ते हटवण्यात आले. पण अलीकडच्या काळात अशाच मशीनची गरज आहे.

नूतनीकरणाचे काम...

फोंड्यातील या मुक्तिधामाच्या नूतनीकरणात इमारतीच्या छताची दुरुस्ती व नूतनीकरण तसेच जमिनीचे टाईल्स बदलून चांगले टाईल्स बसवणे, लाकूडसाठ्यासाठी स्टोरेज रूम करणे, मुक्तिधामात अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या बसण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध करणे, स्वच्छतेसाठी पाणी व इतर सुविधा उपलब्ध करणे, वाहनांसाठी सुविहित पार्किंग सुविधा, अंत्य संस्कारासाठी चांगली सोय उपलब्ध करणे, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण, इमारतीसह कंपाऊंडचे बांधकाम तसेच मुक्तिधामाच्या दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण आदी कामाचा त्यात समावेश आहे. या कामासाठी एकूण १ कोटी १९ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

फोंडावासीयांना नेहमीच चांगले ते देण्याचा आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. नगराध्यक्ष या नात्याने मी स्वतः फोंडावासीयांच्या हितासाठी कार्यरत आहे. फोंड्याला जे चांगले ते देण्याचा माझा आग्रह आहे, त्यातूनच मुक्तिधामाच्या नूतनीकरणाचे काम चालीस लागले. पुढील काळात फोंड्यात अनेक चांगली कामे होतील, हे नक्की.

- रितेश नाईक (नगराध्यक्ष, फोंडा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com