Ponda Constituency: फोंड्यात वाहतेय निवडणुकीचे वारे!

फोंडा पालिकेच्या विद्यमान मंडळाचा कार्यकाल 22 मे रोजी संपतो आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे चित्र आहे.
Ponda Constituency
Ponda ConstituencyDainik Gomantak

Ponda Constituency: फोंडा पालिकेच्या विद्यमान मंडळाचा कार्यकाल 22 मे रोजी संपतो.त्यामुळे एप्रिल अखेरीस निवडणुकीच्या शक्यतेने शहर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसत आहे.

पालिकेवर सध्या भाजपचे अर्थात मंत्री रवी नाईक यांचे वर्चस्व असून गतवेळी 15 पैकी 7 जागा जिंकून मगोच्या डॉ. केतन भाटीकर यांनी आव्हान उभे केले होते. त्याची ते पुनरावृत्ती करतात का,याची चर्चा आहे.

फोंडा शहर हे राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसेंदिवस या शहराचा विस्तार वाढत आहे. विस्ताराबरोबर काही समस्याही जाणवू लागल्या आहेत.

सध्या शहरात ठिकठिकाणी बंगल्यांचे जाळे दिसत आहे. शांतीनगर, खडपा बांध, वारखंडे सारखे भाग दाट वस्तीने व्यापले आहेत. शहर मर्यादा वाढली असून कुर्टी - खांडेपारही 'मिनी फोंडा' म्हणून ओळखले जाताहेत.

Ponda Constituency
Goa District Collector: जिल्हाधिकाऱ्यांचा फर्मान, 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांकडे मागितले 1000 रुपये!

फोंडा पालिकेचे प्रारंभी दहा प्रभाग होते.आता ती 15 झाली असून यावेळी 16 होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान पालिका मंडळाची मुदत 22 मे रोजी संपुष्टात येत असून एप्रिल अखेरीस निवडणूक जवळपास निश्चित आहे. या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

फोंडा विकास समितीची तयारी सुरू

फोंडा विकास समितीने दोन निवडणुकांत सक्रिय भाग घेतला होता. याही वेळी समिती काही उमेदवारांना पाठिंबा देईल,असे अध्यक्ष राम कुंकळकर यांनी सांगितले.

रॉयही रिंगणात उतरणार !

गेल्या निवडणुकीत रवी नाईक हेच फोंड्याचे आमदार होते. पण त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपचे कृषिमंत्रीही आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांना प्रतिष्ठेची आहे. सध्या त्यांचे पुत्र रितेश नगराध्यक्षपदी असून नव्या मंडळातही तेच नगराध्यक्ष राहतील, यावर रवी नाईक यांचा कटाक्ष असेल. त्या दृष्टीने त्यांनी रणनीतीला सुरुवात केली असून पॅनलही निश्चित केल्याची चर्चा आहे. त्यांचे दुसरे पुत्र रॉय हेही रिंगणात उतरणार असल्याचे कळते.

Ponda Constituency
Margao Construction: ‘मडगाव रवींद्र भवनचे मेपर्यत काम पूर्ण होणार’

भाटीकरांचीही मोर्चेबांधणी

दुसऱ्या बाजूला म. गो पक्षाचे डॉ. केतन भाटीकर यांनी ही मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून काही विद्यमान नगरसेवक पुन्हा त्यांच्या पॅनलतर्फे निवडणूक लढवणार असल्याचे कळते. गतवेळी 15 पैकी सात जागा जिंकून भाटीकरांनी बाजी मारली होती.

त्याची पुनरावृत्ती करतात, की नाही ते बघावे लागेल. मात्र यावेळी भाजप व म. गो. पक्षाची सरकारात युती असल्यामुळे मगो पक्षाच्या कार्यप्रणालीवर काही मर्यादा येतात, का हेही पहावे लागेल.

कॉंग्रेसचे वेरेकर करिष्मा करणार ?

काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार याची माहिती प्राप्त झालेली नाही. ज्येष्ठ कार्यकर्ते शेख शब्बीर यांना काँग्रेसने पालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरावे वाटते. गतवेळी फक्त तीनच जागा मिळाल्या होत्या. यावेळी राजेश वेरेकर हे फोंड्यात काँग्रेस नेते असून विधानसभा निवडणुकीत त्यांना 6800 मते मिळाली होती. आता पालिका निवडणुकीत ते करिष्मा दाखवतात का, हे पहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com