South Goa District Collector: जिल्हाधिकाऱ्यांचा फर्मान, 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांकडे मागितले 1000 रुपये!

Goa District Collector: दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचार्‍यांना 1000 रुपयांचे योगदान देण्यास सांगितले आहे.
Money |Goa Government
Money |Goa GovernmentDainik Gomantak

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचार्‍यांना 1000 रुपयांचे योगदान देण्यास सांगितले आहे. मात्र यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (South Goa District Collector Demands 1000 Rupees each from the Staff)

गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आम आदमी पक्षाने या आदेशावर सडकून टीका केली आहे. या विषयावरील वाद पाहून कलेक्टर ज्योती कुमारी म्हणाल्या की, हा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम नाही.

येथे, गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) प्रमुख विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर निशाणा साधला आहे.

त्यांनी दावा केला की, 'मुख्यमंत्र्यांनी सरकारी तिजोरी रिकामी केली आहे. आता ते सरकारी कामांसाठी योगदानाचा अवलंब करत आहेत.'

Money |Goa Government
Mahadayi Water Dispute: 'सेव्ह म्हादई' सभेबाबतची गोवा पोलिसांची 'ती' कृती सर्वस्वी चुकीचीच

दरम्यान, 1 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकात, दक्षिण गोव्याच्या कलेक्टरांनी सांगितले की, '26 जानेवारी 2023 रोजी मटान्ही सलदान्हा प्रशासकीय मैदानावर रिपब्लिक डे उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व इच्छुक सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 1000 रुपयांचे योगदान दिले पाहिजे.'

तसेच, 20 जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली आहेत.

या परिपत्रकावर झालेल्या गदारोळात GFP प्रमुख सरदेसाई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हे योगदान आहे की खंडणी? प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत आहे, गोवा (Goa) सरकार पूर्णपणे दिवाळखोर झाले आहे का?

गोवा सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सरकारी तिजोरी रिकामी केली आहे. आणि आता समारंभासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली आहे.'

Money |Goa Government
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'वरून प्रमोद सावंत यांनी कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

दुसरीकडे, आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी ट्विट केले की, 'भ्रष्ट कार्यक्रमांवर उधळण्यासाठी तुमच्याकडे पैसाच पैसा आहे. पण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे तुम्हाला वसूल करायचे आहेत का? लाज वाटली पाहिजे.'

मात्र, या वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी बाल संगोपन संस्था आणि वृद्धाश्रमांना मदत करण्यासाठी पैसे जमा केले जात असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com