Deepak Dhavalikar
Deepak DhavalikarDainik Gomantak

Ponda By Election: "फोंड्यात आमचा रितेश नाईकनाच पाठिंबा"! ढवळीकरांची ठाम भूमिका; भाटीकरांच्या पक्ष प्रवेशाबाबत केले मोठे विधान

Deepak Dhavalikar: केतन भाटीकर यांनी मगो पक्ष सोडला आहे. त्‍यामुळे पुढे काय निर्णय घ्‍यायचा हे तेच ठरवतील, असे मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी रविवारी सांगितले.
Published on

पणजी: फोंड्यातील पोटनिवडणुकीत मगो पक्षाने अगोदरच माजी मंत्री स्‍व. रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांना पाठिंबा दिला आहे. त्‍या भूमिकेवर आम्‍ही ठाम आहोत. केतन भाटीकर यांनी मगो पक्ष सोडला आहे. त्‍यामुळे पुढे काय निर्णय घ्‍यायचा हे तेच ठरवतील, असे मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी रविवारी सांगितले.

नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगो युतीला घवघवीत यश मिळाले. त्‍यानंतर अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांच्‍या निवडीबाबत ढवळीकर यांनी भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांची पणजीतील कार्यालयात भेट घेऊन त्‍यांना मगोचे पाठिंबा पत्र दिले.

त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी राजकीय विषयांवर भाष्‍य केले. फोंड्यातील पोटनिवडणूक आणि केतन भाटीकर यांच्‍याबाबत विचारले असता, फोंड्यातील पोटनिवडणुकीत आम्‍ही अगोदरच रितेश नाईक यांना पाठिंबा दिला आहे, त्‍यावर आम्‍ही ठाम आहोत.

Deepak Dhavalikar
Goa Politics: 'मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा'? चोपडेकर यांचा हल्लाबोल; जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप

मगोचे माजी नेते केतन भाटीकर यांनी याबाबत याआधी मांडलेले विचार त्‍यांचे वैयक्तिक होते, असेही ढवळीकर म्हणाले. केतन भाटीकर पुन्‍हा मगोत येऊ इच्‍छित असतील तर त्‍यांना पुन्‍हा प्रवेश मिळेल का? असा प्रश्‍‍न केला असता, त्‍यांनी तसा अर्ज केंद्रीय समितीकडे केला, तर समितीच त्‍यावर अंतिम निर्णय घेईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Deepak Dhavalikar
Goa Politics: 'सिंह' गर्जला, गावडे भडकले! भाजप-मगोप नेत्यांमधील वादाने गोव्याचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांच्या दरबारी कुणाला मिळणार 'न्याय'?

...पदांवर दावा नाही!

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजप–मगो युतीला मोठे यश मिळाले. मगोसोबतच्‍या युतीचा भाजपला दोन्‍हीकडे फायदा झाला. परंतु, जिल्‍हा पंचायतींच्‍या अध्‍यक्ष किंवा उपाध्‍यक्षपदांवर मगोने आतापर्यंत कोणताही दावा केलेला नाही, असेही दीपक ढवळीकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com