Ponda By Election: पक्षाचा आपण 'निष्ठावंत कार्यकर्ता'! विश्‍वनाथ दळवी करणार रितेश नाईक यांचा प्रचार; कार्यकर्त्यांच्या शंका दूर

Vishwanath Dalvi: रितेश नाईक यांच्यासोबत आपण असून प्रचारावेळी आपण आपले समर्थक उपस्थित राहणार असल्याची ग्वाही फोंड्यातील भाजपचे नेते विश्‍वनाथ दळवी यांनी फोंड्यात दिली.
Ponda By Election
Ponda By ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यातील भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांच्यासोबत आपण असून प्रचारावेळी आपण आपले समर्थक उपस्थित राहणार असल्याची ग्वाही फोंड्यातील भाजपचे नेते विश्‍वनाथ दळवी यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्‍वनाथ दळवी यांचे समर्थक शौनक बोरकर व अभिजीत गावडे उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचा आपण एक निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाने वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत. तरीही आपल्याला फोंड्याची उमेदवारी का दिली नाही, यावरून कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला, आणि त्या दिवशी गोंधळ झाला.

आता हा प्रश्‍न मिटला असून आपण आणि आपले समर्थक रितेश नाईक यांच्यासोबत राहणार असून पक्षाचा प्रचार करू, असे विश्‍वनाथ दळवी यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी आपली चर्चा झाली होती, पण मुख्यमंत्र्यांकडे बोलणी अपेक्षित होती, ती काल झाल्याने सर्व शंकांचे निरसन झाले आहे. देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि नंतर आपण असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, त्यानुसार आपण कार्यरत राहिलो असल्याचे विश्‍वनाथ दळवी यांनी सांगितले.

Ponda By Election
Ponda By Election: दळवींच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह! अन्‍याय झाल्‍याची भावना; रितेश नाईकांपुढे मोठे आव्हान

प्रचाराला प्रारंभ

फोंडा पोटनिवडणुकीतील प्रमुख उमेदवार असलेले भाजपचे रितेश नाईक, काँग्रेसचे केतन भाटीकर तसेच आपचे गितेश नाईक यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे. त्यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे तिन्ही उमेदवारांचे मत आहे.vishwnath

Ponda By Election
Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

भाजप, काँग्रेस, ‘आप’ भरणार अर्ज

फोंडा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी २३ रोजी तीन प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर व ‘आप’चे उमेदवार गितेश नाईक आपापले अर्ज दाखल करणार आहेत. ‘आरजी’ आणि गोवा फॉरवर्डचे मौन असल्याने ते उमेदवारी दाखल करणार नाहीत, असा होरा बांधला जात आहे.

भाजपचे उमेदवार रितेश नाईक आपल्या कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने सकाळी उमेदवारी दाखल करणार आहेत. खडपाबांध - फोंडा येथील रवी नाईक यांच्या कार्यालयाजवळून ही भव्य मिरवणूक निघणार आहे. भाटीकर हेही आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल करणार आहेत, यावेळी काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ‘आप’चे गितेश नाईक हे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक तसेच इतर पदाधिकाऱ्यांना घेऊन उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com