Ponda By Election: फडणवीसांमुळे फोंड्यात रंगत? भाटीकरांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरूच; गोवा फॉरवर्ड अलिप्तच

Ponda By-Election 2026 Fadnavis Rally: देवेंद्र फडणवीस यांच्या फोंडा बसस्थानकावर झालेल्या जाहीर सभेमुळे सध्या फोंडा पोटनिवडणूक ‘रंगीन मोड’वर आली असून त्यामुळे या पोटनिवडणुकीला एकप्रकारचे ग्लॅमर प्राप्त व्हायला लागले आहे.
Ponda By Election
Ponda By ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोंडा बसस्थानकावर झालेल्या जाहीर सभेमुळे सध्या फोंडा पोटनिवडणूक ‘रंगीन मोड’वर आली असून त्यामुळे या पोटनिवडणुकीला एकप्रकारचे ग्लॅमर प्राप्त व्हायला लागले आहे. ही निवडणूक सहा-सात महिन्यांकरता असूनही भाजपने यात सर्वस्व ओतले असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आतापर्यंत तीसहून अधिक कोपरा बैठका संबोधित केल्या असून त्याशिवाय फोंड्यातील राजकारणावर प्रभाव असलेल्या काही दिग्गजांच्या घरांना भेटीही दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही कोणतीच कसर बाकी ठेवलेली दिसत नसून त्यांनी २५ हून अधिक कोपरा बैठका संबोधित केलेल्या आहेत.

त्याशिवाय कुंपणावर बसलेल्या अनेक व्यक्तींना भाजपकडे वळविण्याचा केलेला त्यांचा प्रयत्नही लपून राहिलेला नाही. पण या सर्व प्रचारात अधोरेखित होणारी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना वैयक्तिकरीत्या ‘टार्गेट’ करण्याचे केलेले प्रयत्न. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोंड्यात येण्यामागे हेही एक प्रयोजन असू शकते, असे इथे बोलले जात आहे. पण एका पोटनिवडणुकीकरता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यात येणे यातूनच या पोटनिवडणुकीचे महत्त्व प्रतीत होत आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस ‘डिफेन्सिव्ह बॅटिंग’ करताना दिसत असून उमेदवार भाटीकर हे भाजपच्या या टीकास्त्रांना आपल्यापरीने तोंड देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या साथीला विशेष कुमक दिसत नसली तरी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नांडिस हे किल्ला लढविताना दिसत आहेत.

Ponda By Election
Goa Accident: दोनापावल-बांबोळी मार्गावर आलिशान भरधाव कारचा कहर; ठोकर दिल्याने तरुणी ठार, युवक गंभीर

पण विशेष म्हणजे काँग्रेसबरोबर युती असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष प्रचार संपत आला तरी कुठेही दिसलेला नाही. खासदार विरियातो यांनी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना प्रचारात सामील होण्याचे आव्हान करूनही सरदेसाई अजूनपर्यंत प्रचारात सहभागी झालेले बघायला मिळालेले नाही. यातून या दोन पक्षांमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे संकेत मिळत आहेत. तरीही काँग्रेस घरोघरी प्रचार करून ‘धीरे धीरे चल’चा नारा आळविताना बघायला मिळत आहे.

Ponda By Election
Goa Crime: डिचोलीतील 'सेतू संगम'च्या सुरक्षेत त्रुटी, संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

‘आप’नेही आपली असलेली नसलेली सर्व शक्ती पणाला लावली असून त्यांच्या हाती काय लागते, हे बघावे लागेल. २०२२ साली झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला फोंडा मतदारसंघात फक्त ६४० मते प्राप्त झाली होती. आता यावेळी यात किती फरक पडतो हे निकालादिवशी कळून येईल.

एकंदरीत ही पोटनिवडणूक सध्या रंगतदार स्थितीत पोहोचली असून प्रचाराच्या दृष्टीने भाजपने काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आता ही कुरघोडी म्हणजे ‘सर्वच चकाकते ते सोने असतेच असे नाही’ असे जे म्हटले जाते तो प्रकार की काय, हे कळायला मात्र ४ मेची वाट पाहावी लागणार आहे, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com