फोंडा पोस्ट ऑफिसशी संलग्न 7 पोस्टमन कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याची माहिती 19 सप्टेंबर रोजी समोर आली. यावरुन आज रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
( ponda 7 postman suspended Viresh Borkar Revolutionary Goans Party aggressive )
बोरकर यांनी 7 पोस्टमन कर्मचाऱ्यांना कोणत्या कारणावरुन कामावरुन कमी केल्याचा जाब विचारला. तसेच इतर राज्यातील नागरिकांना गोव्यात नोकरी मिळतेच कशी? असा खडा सवाल केला. तसेच स्थानिक कर्मचाऱ्यांना पदावरून काढून टाकण्याबाबत कारण विचारले. यावेळी पोस्ट कार्यालय अधीक्षक यांनी स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याबाबतचे अधिकार आमच्याकडे काहीही नाहीत.
याबाबतचे सर्व अधिकार मंत्रालयाकडे आहेत. तसेच इतर राज्यातील फक्त कर्नाटक महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यातील कर्मचाऱ्यांना कामावर घेत आहोत. त्यामूळे सर्व नियमांचे पालन करत करण्यात आले आहे. त्यामूळे याबाबत अधिकची माहिती आपल्याला मंत्रालयात मिळेल असे ते म्हणाले.
नेमका काय प्रकार घडला?
19 सप्टेंबर रोजी फोंडा तालुक्यात प्रमुख पोस्ट कार्यालयातील 7 स्थानिक पोस्टमनला निलंबित केल्याची माहितीसमोर आली आहे. यामध्ये गोव्यातील स्थानिक रहिवाशी असणाऱ्या 18 वर्षापासून ते कमीत कमी 5 वर्षापर्यंत काम केलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. यांना कामावरुन कमी करत त्यांच्याकडून पोस्टकार्यालयातून दिलेला मोबाईल देखील घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या 7 पोस्टमन कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत इतर राज्यातील नागरिकांना नियूक्त केले आहे. यावरुन आम आदमी पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच आता रिव्हॉल्युशनरी गोवन्सने आक्रमक भुमिका घेतली आहे. आज पुन्हा या कार्यालयात जात अधीक्षकांना ही याचा जाब विचारला आहे. अधीक्षकांनी याबाबत सर्व अधिकार मंत्रालयास असल्याने आपण काही करु शकत नाही असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.