Mapusa तील शौचालयांची पालिकेने कर्मचाऱ्यांसह केली पाहणी

Mapusa Municipal: शौचालयांना डागडुजीची गरज आहे आणि कुठली जागा सीएसआरअंतर्गत सोपविली जाऊ शकते.
Chief Officer Amitesh Shirwaikar
Chief Officer Amitesh ShirwaikarDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipal Council: म्‍हापसा मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या मार्केट तसेच शहरातील इतर जागांतील सार्वजनिक शौचालयांची काल मंगळवारी पाहणी करीत आढावा घेतला. यावेळी कुठल्या शौचालयांना डागडुजीची गरज आहे आणि कुठली जागा सीएसआर (Corporate social responsibility) अंतर्गत सोपविली जाऊ शकते, याबाबत म्हापसा पालिका सकारात्मक विचार करणार आहे.

या शौचालायांच्या देखरेखीवर सध्या पालिकेस अतिरिक्त खर्च होतोय. मुळात पालिकेवर सदर शौचालये ही एक प्रकारची जबाबदारी झाली आहे व यातून पालिकेस महसूल देखील मिळत नाही. त्यामुळे कुठली शौचालये सीएसआरअंतर्गत (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) सोपवून त्याद्वारे महसूल मिळविता येईल, या दृष्‍टीने पालिका सध्या सकारात्मक विचार करत आहे. त्यानुसार, म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांनी या शौचालयांची पाहणी केली. म्हापसा पालिकेच्या अखत्यारीत एकूण 30 सार्वजनिक शौचालये येतात.

Chief Officer Amitesh Shirwaikar
Bicholim Municipalityला अखेर जाग डिचोलीतील पत्र्यांचे गाळे हटविणार

म्‍हापसा नगरपालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक भार नकोय. यासाठी म्हापसा पालिका स्वारस्य अभिव्यक्ती निविदा मागविण्याच्या तयारीत आहे, जेणेकरुन शौचालय असलेल्या जागी दुकान थाटण्यासोबतच तेथील शौचालयाची देखरेख व स्वच्छतेची जबाबदारी ही संबंधित दुकानदारावर राहील. तसा करार करण्‍यात येणार आहे. ही कल्पना प्रत्‍यक्षात येते काय, या स्वारस्य अभिव्यक्ती निविदेस कसा प्रतिसाद मिळतो, यावर म्हापसा पालिकेची पुढील कृती ठरणार आहे.

Chief Officer Amitesh Shirwaikar
Artist in Goa : संतुरवादनात डॉक्टरेट मिळालेला एकमेवाद्वितीय गोमंतकीय कलाकार

अमितेश शिरवईकर, मुख्याधिकारी-

म्हापशातील शौचालयांची काल पाहणी केली. अजूनही काही पाहणी बाकी आहे. लोकांना स्वच्छतेच्या दृष्‍टीने चांगली सुविधा व पालिकेस महसूल मिळावा यासाठी प्राथमिक स्तरावर प्रयत्‍न सुरु आहे. येत्या महिनाभरात हा विषय मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com