लंडनच्या एका पबमध्ये मे 2017 मध्ये महिलेवर बलात्काराचा आरोप असलेल्या एकास गोवा पोलिसांनी अटक केली आहे. पोर्तुगीज नागरिक पण सध्या बेतालभाटी येथील रहिवाशी असलेल्या जोस इनासिओ कोता याच्यावर पाच वर्षांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी बेतालभाटी येथे ही कारवाई केली.
(five years after rape in london pub portuguese national arrested in goa)
गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, या आरोपीवर सध्या दिल्ली न्यायालयात प्रत्यार्पणाची कारवाईला सुरु असून आरोपी कोटाला यूकेमधील लंडन येथे असताना बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आली आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून, सीबीआय गोवा पोलिसांकडे अटक वॉरंटची विनंती करणार आहे. दिल्लीतील प्रत्यार्पण न्यायालयासमोर आरोपी कोता याला हजर करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी कोताने मे 2017 मध्ये कथितरित्या गुन्हा केला होता. त्यानंतर महिन्याभरात तो भारतात परतला. कोता यांच्यावरनंतर यूकेच्या लैंगिक अपराध कायदा, 2003 च्या कलम 1(1) अंतर्गत बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात यूकेमधील मॅजिस्ट्रेट कोर्टाने जून 2019 मध्ये त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. परिणामी, यूके सरकारकडून प्रत्यार्पणाची विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडून प्राप्त झाली.
भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार
पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, भारत आणि ब्रिटन या देशांमध्ये प्रत्यार्पण करार आहे. त्यामूळे दोन्ही देशांमध्ये गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एक पद्धत ठरलेली आहे. त्या सर्व प्रक्रियेचा अवलंब केला जाणार आहे.
त्यामूळे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, प्रत्यार्पणाच्या विनंतीची चौकशी करण्यासाठी प्रत्यार्पण कायद्याच्या कलम 5 अंतर्गत अर्ज न्यायालयात पाठवण्यात आला आहे. जुलै 2021 मध्ये, सीबीआय-इंटरपोल मार्फत कोटाविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.