Goa Politics: राणे कुटुंबात राजकीय युद्ध

पर्येकडे लक्ष : ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे प्रचारात सक्रिय
Rane Family
Rane Family Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे तेजीत असून अनेक मतदारसंघांत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघाची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे राणे कुटुंबातच आमदारकीचा सामना रंगणार आहे असे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) यांनी आकस्किमपणे प्रचाराला सुरवात केली. सध्याची स्थिती पाहिली तर पर्येमध्ये सासरे राणे-सून दिव्या किंवा सासू विजयादेवी-सून असा राजकीय सामना असेल. असे झाल्यास गोव्याच्या इतिहासात प्रथमच अशी लढत होईल.

Rane Family
New voters Opinion : राजकारणात सक्षम, निष्ठावंतांची गरज!

पर्ये मतदारसंघातून (Parye Constituency) काँग्रेसने ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावर आपण निवडणूक लढविण्याबाबत ठाम नसल्याचे सांगत राणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. पण सोमवारी पर्ये येथील भूमिका देवी मंदिर, म्हाळसा मंदिर आणि केरी येथील श्री आजोबा मंदिर येथे जात प्रतापसिंग राणे यांनी नारळ ठेवून काँग्रेसचा उमेदवार विजय व्हावा अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी विजयादेवी राणे, रणजित राणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार कायम ठेवल्यास या मतदारसंघांमधून प्रतापसिंग राणे विरुद्ध डॉ.दिव्या राणे अशी सासरे विरोध सून अशी लढत होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रतापसिंग यांच्या ऐवजी पत्नी विजयादेवी निवडणूक लढवू शकतात. यातच या मतदारसंघांत आपने विश्वजीत कृष्णराव राणे यांनाही उमेदवारी दिली आहे. हे राणेही त्या राण्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. सीनियर राणे विरुद्ध दिव्या राणे विरुद्ध विश्‍वजित राणे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सीनियर राणे यांचे चिरंजीव आणि दिव्या राणे यांचे पती यांचे नावही विश्वजीत राणे आहे. त्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.

Rane Family
रस्त्यांवर खड्डे, पाण्याचीही समस्या, पणजीकर त्रस्त

भाजपसमोर पेच

भाजपने विश्वजित यांच्या पत्नी डॉ. दिव्या यांना पर्येमधून उमेदवारी दिली. हा मतदारसंघ राणेंचा बालेकिल्ला आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून प्रतापसिंग विजयी होत आहेत. मात्र, मध्यतंरी त्यांनी माघार घेतल्याने दिव्या यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात होता. परंतू, प्रतापसिंग प्रचाराच्या मैदानात उतरल्याने विश्‍वजीत राणे यांच्यासह भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे.

तर विजयादेवींना उमेदवारी

पी.चिदंबरम (P Chidambaram) यांनी रविवारी प्रतापसिंग राणेंनी आपली उमेदवारी पर्येतून निश्चित करावी किंवा त्यांनीच काँग्रेसचा उमेदवार द्यावा असे आवाहन केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रतापसिंग यांनी प्रचार सुरू केला. निवडणूक स्वत: ते लढवणार की अन्य कोणी याबाबत अनिश्‍चितता आहे. मात्र, प्रतापसिंग यांनी माघार घेतल्यास विजयादेवी उमेदवार असू शकतात.

मंत्रिपदाचा दर्जा देऊनही...

प्रतापसिंह राणेंनी निवडणूक लढवू नये, यासाठी भाजपकडूनही शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. गोव्यातील भाजप (BJP) सरकारने नुकतेच प्रतापसिंग राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्री दर्जा देत राजकारणातून निवृत्त होण्यास वाट मोकळी करून दिली होती. इतकंच नाही तर विश्वजीत राणेंनी वडील प्रतापसिंग यांनी सन्मानाने निवृत्त व्हावे असा सल्लाही दिला होता.

तुम्हाला लवकरच कळेल : प्रतापसिंग राणे

तुम्ही यंदा निवडणूक लढविणार का असा प्रश्‍न ‘गोमन्तक’ने प्रतापसिंग राणे यांना थेट विचारला. यावर ते म्हणाले, मी आज पत्नीसह मंदिरात गेलो होतो. देवाला नारळ अर्पण करणे म्हणजे निवडणुकीचा प्रचार सुरू करणे नव्हे. माझा निवडणुकीबाबतचा निर्णय तुम्हाला लवकरच कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com