गोलमाल है भाई..! गोव्यातील नव्या आमदाराने सत्तेतील नेत्याकडून घेतली 10 लाखांची लाच; नेत्याची बढती झाली अन् पितळ उघडं पडलं, भाजप नेत्यानं सांगितला किस्सा

Goa political corruption: नेता आणि संबंधित खात्याचा मंत्री यांची भेट झाल्यावर नेत्यांना याबाबत विचारणा केली. पण, कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या देवाणघेवाणीबाबत मंत्र्याने स्पष्ट नकार दिला.
Illegal nightclubs in Goa  Dance bar shutdown Goa
BJP Leader Savio RodriguesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील सत्ताधारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप गेल्या एक - दोन वर्षापासून होतच आहेत. पांडुरंग मडकईकर असो किंवा गोविंद गावडे यांनी विद्यमान सरकारमधील भ्रष्टाचारावर खुलेआम भाष्य केलंय. विद्यमान सरकारची वारंवार समीक्षा करणाऱ्या भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी अलिकडेच घडलेले प्रकरण उघडकीस आणले आहे. सरकारमधील बडा नेता आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या व्यक्ती या दोघांमधील हा किस्सा आहे.

सावियो रॉड्रिग्ज यांनी एक्सवरुन एक पोस्ट केली आहे. सावियो यांनी पोस्टमधून दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाच्या दक्षिण गोव्यातील एका ज्येष्ठ नेत्याकडे आमदाराने १० लाख रुपयांची मागणी केली. व्यक्तिगत गृहप्रकल्पासंबधित मंजुरीसाठी आमदाराने या रक्कमेची मागणी केली होती. विशेष म्हणजे पैशांची मागणी करणाऱ्या या आमदाराची पहिलीच टर्म आहे, अशी माहिती सावियो यांनी दिली आहे.

Illegal nightclubs in Goa  Dance bar shutdown Goa
Goa ZP Election Result: विरोधकांच्या फुटींमुळे भाजपचे परत एकदा ‘बल्ले बल्ले’! विरोधकांचे हवेत उडणारे पतंग जमिनीवर आपटले..

गृहप्रकल्पाचे खाते पाहणाऱ्या मंत्र्याला हे पैसे द्यायचे असल्याचा दावा या नव आमदाराने करुन नेत्याकडून पैसे घेतले होते. दरम्यान, काही काळ गेल्यानंतर या नेत्याची पक्षात बढती झाली आणि नेता पक्षाच्या उच्च पदावर बसला. यानंतर नेता आणि संबंधित खात्याचा मंत्री यांची भेट झाल्यावर नेत्यांना याबाबत विचारणा केली. पण, कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या देवाणघेवाणीबाबत मंत्र्याने स्पष्ट नकार दिला.

Illegal nightclubs in Goa  Dance bar shutdown Goa
Goa ZP Election 2025: गोव्यातील पंचायतीराज प्रणालीअंतर्गत निवडून आलेल्यात 40% प्रतिनिधित्व महिलांचे; सत्तेच्या समान भागीदार

यानंतर नव आमदाराला पक्षाकडून समन्स बजावण्यात आला. घडलेला प्रकार उघडकीस आल्यानंतर आमदाराला संबंधित नेत्याला सर्व पैशे परत करावे लागले. आमदाराने दोन आठवड्यांच्या कालावधीत सर्व पैसे देऊन टाकले, असे सावियो यांनी पोस्ट म्हटले आहे.

सावियो नेहमीच सरकारमधील चुकीच्या गोष्टी तसेच चांगल्या गोष्टींवर भाष्य करत असतात. हा प्रकार देखील त्यांनी उघडकीस आणत आमदाराचे पितळ कसे उघडकीस आले हे सांगितले. दरम्यान, आता हा आमदार आणि नेता कोण? याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com