Goa Murder Case: माडेल खूनप्रकरणी पोलिस घेणार लूकआऊट नोटीसची मदत

माडेल येथील खुनातील संशयित पाेलिसांच्या हाती लागला असला तरी ज्याचा खून झाला त्याची ओळख अजूनही पटू शकलेली नाही.
Murder At Bicholim And Madel
Murder At Bicholim And MadelDainik Gomantak
Published on
Updated on

माडेल येथील खुनातील संशयित पाेलिसांच्या हाती लागला असला तरी ज्याचा खून झाला त्याची ओळख अजूनही पटू शकलेली नाही. त्‍यासाठी आता पोलिस लूकआऊट नोटीसची मदत घेणार आहेत. मृताची छायाचित्रे या नोटीसवर असतील व त्‍याद्वारे पोलिस त्‍याची ओळख पटविण्‍यासाठी आवाहन करणार आहेत.

Murder At Bicholim And Madel
Architecture College: आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचा थेट वर्गावरच बहिष्कार

30 ऑगस्ट रोजी या इसमाचा मृतदेह एका बांधकाम प्रकल्पाच्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता. या खून प्रकरणात नंतर वीरेश यल्लाप्पा मदार याला अटक केली होती. आपली दारू प्यायला म्हणून या संशयिताने मृताच्या डोक्यात दगड घातला होता.

मंगळवारी रात्री वीरेशने दारुची बाटली आणली होती.मृताने संशयिताची दारु ढोसली होती व नंतर तो त्‍याच्‍याच रोजच्‍या जागेवर झोपला होता. त्‍यामुळे चिडलेल्‍या वीरेशने त्याच्या डोक्‍यात दगड घालून घटनास्‍थळाहून निघून गेला होता. तो आणि मयत हे दोघेही भंगार गोळा करीत होते. फातोर्डा पोलिस निरीक्षक धितेंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.

Murder At Bicholim And Madel
Traffic Signal: राज्यातील बहुतांश वाहतूक सिग्नल निष्क्रिय

ओळखीसाठी ‘टॅट्यू’चा धागा

मृताच्‍या हातावर एक टॅट्यू असून, त्‍यावर कन्नड भाषेतून राहुल असे लिहिले गेले आहे. हा एकमेव धागा पोलिसांना सापडला आहे. दारुच्‍या नशेत हा खून झाला होता, हे तपासात उघड झाले आहे.

खून प्रक़रणात वीरेश मदार याला पोलिसांनी अटक करून 9 दिवसांच्‍या पोलिस रिमांडवर घेतले आहे. पण तोही मृताला ओळखत नाही. तो कर्नाटकातील बागलकोट येथील आहे. संशयित व मयत हे कानडीतून संवाद साधत होते. त्‍यामुळे मयतही कर्नाटकातीलच असावा, असा पाेलिसांचा कयास आहे. कर्नाटक पोलिसांनाही याबाबत कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com