Zuari Car Accident
Zuari Car AccidentDainik Gomantak

Goa Zuari Bridge Accident : अमित पालेकरांची गोवा सरकारवर जोरदार टीका, म्हणाले...

Amit Palekar : गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांना गोव्यातील जनतेशी काही घेणेदेणेच नाही.

काल मध्यरात्री झुआरी पुलावरुन एक कार नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त डस्टर कार नौदल आणि तटरक्षक दलाकडून कार काढण्यात शोधपथकाला यश आलं आहे. आता कारमधील 4 मृतदेहही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहेत.

Zuari Car Accident
Morjim: मांद्रे, मोरजीत ‘सीआरझेड’ धाब्यावर!

या अपघातामुळे राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. यादरम्यान, आप नेते अमित पालेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारच चांगलीच टीका केली आहे.

ते म्हणाले, 'झुआरी पुलावर जिथे खड्डे आणि रस्त्यामध्ये अंतर (गॅप) आहे, तिथून येणारी-जाणारी प्रत्येक गाडी सावकाश होते. त्याच ठिकाणाहून काल अपघात झालेली गाडी ब्रेक करून पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली.'

गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांना गोव्यातील जनतेशी काही घेणेदेणेच नाही. सरकारने गोव्याला खड्ड्यात टाकले आहे. या किंवा कोणत्याही घटनेचे राजकारण करणे चुकीचेच आहे परंतु घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

त्याचबरोबर अतिवेगात वाहने चालवून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

अपघातातील मृतांची नावं

1. आल्विन आरावजी

2. हेन्री आरावजो

3. प्रेसिला क्रुझ

4. ऑस्टिन फर्नांडिस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com