Goa: विनापरवाना सुरु असलेल्या कॅसिनोवर पोलिसांची धाड

सासष्टी (Salcete) तालुक्यातील वार्का येथील सी ब्रिज हॉटेलमध्ये विनापरवाना सुरु असलेल्या कॅसिनोवर (Casino) मध्यरात्री 3 वाजता (18 सप्टेंबर) मडगाव व कोलवा पोलिसांनी छापा टाकून 15 जणांना अटक केली.
Police raid casino in Varca
Police raid casino in VarcaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी - सासष्टी (Salcete) तालुक्यातील वार्का येथील सी ब्रिज हॉटेलमध्ये विनापरवाना सुरु असलेल्या कॅसिनोवर (Casino) मध्यरात्री 3 वाजता (18 सप्टेंबर) मडगाव व कोलवा पोलिसांनी छापा टाकून 15 जणांना अटक केली. पण, नंतर सर्व संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 6 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Police raid casino in Varca
Goa: मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केलेली नाही; श्रीपाद नाईक

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव व कोलवा पोलिसांनी ही कारवाई केली. वार्का येथील सी ब्रिज या हॉटेलमध्ये कॅसिनो जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, अटक करण्यात आलेले संशयित जुगार खेळताना दिसले. पोलिसांनी त्यांना अटक करुन कॅसिनो खेळण्यासाठी वापरण्यात येणारे चिप्स, पत्ते व 6 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com