Goa Liberation Day: पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती & खर्गे; गोव्यातील जनतेला कोणी काय दिल्या शुभेच्छा

गोवा विद्यापीठाच्या मैदानावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्वजारोहण पार पडले.
Goa Liberation Day
Goa Liberation DayDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा 62 वा मुक्तीदिन आज (सोमवार, दि.19) राज्यात विविध ठिकाणी साजरा होत आहे. ताळगाव येथील गोवा विद्यापीठाच्या मैदानावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्वजारोहण पार पडले. देशाच्या जडणघडणीत गोव्याचे योगदान असणे खूप महत्वाचे आहे.आपण गोल्डन गोवा या स्वप्नाच्या जवळ जात आहोत. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले.

Goa Liberation Day
Goa Liberation Day: रोजगार, टॅक्सी, पर्यटन, महिला सशक्तीकरण; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गोव्याच्या जनतेला मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी, गोवा मुक्तीच्या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांचे धैर्य आणि अतुलनीय योगदानाचे आम्ही स्मरण करतो. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन गोव्याच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत."

Goa Liberation Day
Goa Libration: नाहीतर 'गोवा' आज एक स्वतंत्र 'देश' असता; ती एक भेट झाली नाही अन्...

"गोवा मुक्तीदिनानिमित्त गोव्यातील बंधु-भगिनिंना शुभेच्छा. गोव्याला परकीय राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्व शूरविरांचे स्मरण करून त्यांच्या शौर्याला नमन करतो." अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Goa Liberation Day
Goa Liberation Day 2022: 'गोल्डन गोवा'; राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या मुक्तिदिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दिल्या शुभेच्छा. "गोवा मुक्तीदिनानिमित्त मी नागरिकांना, विशेषत: गोव्याच्या जनतेला माझ्याकडून शुभेच्छा. वसाहतवादी राजवटीतून गोवा मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली. सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम. गोव्याच्या जनतेला माझ्या शुभेच्छा."

Goa Liberation Day
Goa Liberation Day 2022: गोवा मुक्तीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी गोमंतकियांना दिल्या शुभेच्छा

"61 वर्षापूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय नेतृत्वाखाली भारतीय लष्काने 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून गोवा स्वतंत्र केला. मुक्तिदिनाच्या गोव्यातील जनतेला शुभेच्छा. देव बरें करूं." अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com