PM Modi Goa Visit : 11 डिसेंबर हा गोव्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस ठरला आहे. आज देशाचे पंतप्रधान गोव्यात आले होते. पणजीत सुरू असलेल्या नवव्या आयुर्वेद काँग्रेस परिषदेच्या समारोपाला ते हजार राहिले. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), गोवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (NIUM), गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी (NIH), दिल्ली या 3 राष्ट्रीय आयुष संस्थांचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. आज मी घोषणा करत आहे की आम्ही राज्यातील आयुष डॉक्टरांसाठी गोव्यात आयुष मंत्रालय तयार करू. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले.
आपले मत व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या 3 संस्था आयुष आरोग्य व्यवस्थेला गती देतील. 30 हून अधिक देशांनी आयुर्वेदाला पारंपारिक औषध पद्धती म्हणून मान्यता दिली आहे. आपल्याला इतर देशांमध्येही आयुर्वेदाचा प्रचार करावा लागेल. मला खात्री आहे की या तिन्ही संस्था आयुष आरोग्य सेवा प्रणालीला नवी चालना देतील. आयुर्वेद हे असे ज्ञान आहे ज्याचे ब्रीदवाक्य सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया आहे. याचा अर्थ प्रत्येकाचा आनंद आणि प्रत्येकाचे आरोग्य. ते म्हणाले की, गोव्यासारख्या पर्यटन राज्यात आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला प्रोत्साहन देऊन पर्यटनाला चालना देण्याची क्षमता आहे.
आयुर्वेदाच्या 'डेटा बेस्ड एव्हिडन्स'चे दस्तऐवजीकरण करावे लागेल : पंतप्रधान
जगही या प्राचीन जीवनाच्या तत्त्वज्ञानाकडे परत येत असल्याचे मोदी म्हणाले. मला आनंद आहे की भारतात आयुर्वेदाचे काम आधीच सुरू झाले आहे. आपल्याकडे आयुर्वेदाचे अतिप्राचीन ज्ञान आहे, पण पुराव्याच्या बाबतीत आपण मागे पडत होतो. म्हणूनच आज आपल्याला 'डेटा बेस्ड एव्हिडन्स'चे डॉक्युमेंटेशन करायचे आहे. त्यासाठी दीर्घकाळ सतत काम करावे लागणार आहे. आयुष उद्योग गेल्या 8 वर्षांत 20,000 कोटींवरून 1.4 लाख कोटी रुपयांपर्यंत सातपट वाढला आहे.
One Earth, One Health
आज भारताने जगासमोर एक पृथ्वी, एक आरोग्य (One Earth, One Health) असा भविष्यकालीन दृष्टीकोन ठेवला आहे. एक पृथ्वी, एक आरोग्य म्हणजे आरोग्याबाबत सार्वत्रिक दृष्टी. यानंतर पंतप्रधानांनी मोपा विमानतळाचे उद्घाटन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.