मागील अनेक दिवसांपासून मोपा विमानतळावरून गोव्यात राजकारण सुरू होते. विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे यावरून वाद सुरू होते. पण आज अखेर मोपाच्या उद्घाटनावेळी विमानतळाचे अधिकृत नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. स्व. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव मोपा विमानतळाला देण्यात आले.
गोव्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी सतत काम केले जात आहे. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचा गोव्याला लाभ झाला आहे. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे आणि 'स्वयंपूर्ण गोवा'चे कौतुक केले.
गेल्या आठ वर्षात देशात जवळपास 72 नवी विमानतळे तयार झाली. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात केवळ 70 विमानतळे आणि आमच्या 8 वर्षांच्या काळात नवीन 70 हून अधिक विमानतळे तयार झालीत आणि हाच महत्वाचा फरक आहे.
यामुळे आता हवाई प्रवास सर्वसामान्यांच्या आवाकात आला. मध्यवर्गियांचे विमान प्रवासाचे स्वप्न पुर्ण होत आहे. भारत जगातील तिसरी मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनली आहे. एअरकनेक्टिव्हिटी विस्तारेल तसा हवाईप्रवास सर्वांना सोयीचा होत चालला आहे. भारत समृद्ध होता तेव्हा जगात भारताचे आकर्षण होते. जगभरातून येथे प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी येथे येत होते. मधल्या काळात गुलामीचा एक मोठा कालखंड येऊन गेला. भारताची संस्कृती तीच होती, पण भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
एकविसाव्या शतकातील भारत हा नवा भारत आहे. वैश्विक पातळीवर भारत नवी प्रतिमा रूजवत आहे, त्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे : पंतप्रधान
गोव्याच्या आणि देशातील नागरिकांना नव्या विमानतळाच्या शुभेच्छातुमच्या प्रेमाची आणि साथीची व्याजासकट परतफेड करणार आणि हे त्याचेच एक प्रतीक आहे.
या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव माझे प्रिय सहकारी आणि गोव्याचे लाडके माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
गोव्यात दुसऱ्या विमानतळाची गरज होती. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात त्यासाठी प्रयत्न झाले, पण त्यांचे सरकार गेल्यानंतर हा प्रोजेक्ट लटकला. 2014 मध्ये गोव्याने विकासाचे डबल इंजिन लावले. आम्ही पुन्हा सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सहा वर्षांपूर्वी मी भुमिपूजन केले. यामध्ये अनेक अडचणी आल्या. पण आता हे शानदार विमानतळ बनून तयार आहे. इथे 40 लाख प्रवाशांना हँडल करण्याची सुविधा येथे आहे. आगामी काळात साडेतीन कोटी प्रवाशांना हँडल करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटद्वारे बटण दाबून या विमानतळाचे उद्घाटन केले.
पर्यावरणवाद्यांनी झाडे तोडल्यावरून टीका केली, पण विमानतळ उभारण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी साडे सहा लाख झाडे लावली. जीएमआर कंपनीने पन्नास हजार झाडे लावली.
यापुढे मोपावरून 20 राष्ट्रीय, 12 आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोव्याचा नागरीक आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी हा भावनिक क्षण. भाई मनोहर पर्रीकर आपल्याला आशिर्वाद देत असतील. अटल ब्रिज असो की हायवे असो... पर्रीकरांच्या कारकिर्दीत गोव्याच्या विकासाला खरी सुरूवात झाली.
ते पुढे म्हणाले, मोपा विमानतळाला अनेकदा विरोध झाला, याविरोधात काहीजण कोर्टातही गेले, पण या सगळ्यातून आज मोपा विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मोपाच्या उद्घाटनाचा मोठा आनंद आहे. मोपा विमानतळाचे काम पुर्ण होईपर्यंत पंतप्रधानांनी यावर जातीने लक्ष ठेवले. वेळोवेळी आढावा घेतला.
मोपा विमानतळ उद्घाटनप्रसंगी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, देशातील विमानतळांची संख्या 220 पर्यंत नेणार. या प्रवासात मोपा विमानतळ मैलाचा दगड ठरेल. गोवाचे लोक या उड्डाणाचे भागीदार व्हावेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोपा विमानतळावरील उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी पोहोचले असून थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार असून ते जनतेला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले असून आता लवकरच ते विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. त्याची पायाभरणी नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांच्या हस्ते करण्यात आली. गोव्यातील हे दुसरे विमानतळ आहे.
गोव्यासारख्या पर्यटन राज्यात आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला प्रोत्साहन देऊन पर्यटनाला चालना देण्याची क्षमता आहे : पंतप्रधान मोदी
व्यवस्था नीट नसल्याने संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. अनेक जणांनी घरी परतायला सुरुवात केली आहे.
आज भारताने जगासमोर एक पृथ्वी, एक आरोग्य (One Earth, One Health) असा भविष्यकालीन दृष्टीकोण ठेवला आहे. एक पृथ्वी, एक आरोग्य म्हणजे आरोग्याबाबत सार्वत्रिक दृष्टी : पंतप्रधान
आयुर्वेद हे केवळ उपचारांसाठी नाही तर ते निरोगीपणाला प्रोत्साहन देते. योग आणि आयुर्वेद हे जगासाठी नवीन आशा आहेत. आमच्याकडे आयुर्वेदाचा परिणाम तसेच परिणाम होता, पण पुराव्याच्या बाबतीत आम्ही मागे पडत होतो. म्हणून, आज आपल्याला 'डेटा बेस्ड एव्हिडन्स'चे दस्तऐवजीकरण करावे लागेल : पंतप्रधान
या 3 संस्था आयुष आरोग्य व्यवस्थेला गती देतील. 30 हून अधिक देशांनी आयुर्वेदाला पारंपारिक औषध पद्धती म्हणून मान्यता दिली आहे. आपल्याला इतर देशांमध्येही आयुर्वेदाचा प्रचार करावा लागेल : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. आज मी घोषणा करत आहे की आम्ही राज्यातील आयुष डॉक्टरांसाठी गोव्यात आयुष मंत्रालय तयार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
9व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस (WAC) च्या समारोप समारंभातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटन : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), गोवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (NIUM), गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी (NIH), दिल्ली
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मोपा विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "भाई, आम्ही नेहमी तुमचे स्मरण करतो. आज तुमचे आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. तुमचा आशिर्वाद आम्हाला आणि समस्त गोमन्तकीयांना उर्जा देत राहो. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आज माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मला विमानतळाच्या नामकरणात पडायचे नाही पण आम्ही सुविधा वापरणार आहोत याचा मला आनंद आहे : उत्पल पर्रीकर
गोव्यातील 9व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस (WAC) च्या समारोप समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, दिल्लीचे आभासी पद्धतीने उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले असून त्यांनी आता पणजीत सुरू असलेल्या नवव्या आयुर्वेद काँग्रेस परिषदेला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणल्या गेलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडे यांनी त्यांचे गोव्यात स्वागत केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.