PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे. तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात प्रचारसभेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात होत असलेल्या विकासावर प्रकाश टाकला.

''गोवा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने गोव्याच्या जनतेसाठी काम केले आहे. प्रत्येक योजनांचा लाभ आता खऱ्या अर्थाने मिळू लागला आहे. भाजपच्या सरकारने केवळ अन् केवळ राज्यातील जनतेसाठी काम केले. आतापर्यंत आम्ही करोडो गरीब लोकांसाठी पाच लाखांचा विमा दिला. आता आम्ही गोव्यातील 70 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था करणार आहोत.'' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi
PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मच्छिमार बांधवांकडे दुर्लक्ष केले. पण आता आम्ही मच्छिमार बांधवांसाठी किसान क्रेडिट कार्ड, विमा कव्हरेज देणार आहोत. त्याचबरोबर प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग सेक्टरही विकसित करणार आहोत, असेही मोदी म्हणाले.

गोव्यातील खेळाडूंच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे. येत्या काळात आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

PM Modi
PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सात गॅरंटी दिल्या?

  • सत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देणार

  • येत्या वर्षांत पक्की घरे नसलेल्यांना पक्की घरे बांधणार

  • घरांघरांत पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार

  • मच्छिमारांसाठीच्या विमा योजनेतील अर्थसहाय्यात वाढ करण्याचे आश्वासन

  • सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही

  • गोव्याला आंतरराष्ट्रीय परिषदांचे केंद्र बनवणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com