मडगावातून सांडपाण्यासोबत साळ नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक

साळ नदी प्रदूषित होण्याचे प्लास्टिक हे एक प्रमुख कारण मानले जात आहे
Sal River
Sal RiverDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगावातून साळ नदीत मोठ्या प्रमाणात केवळ सांडपाणीच जात नाही तर तेवढ्याच प्रमाणात प्लास्टिकही नाले आणि गटारांतून वाहून जात असल्याचे दिसून आले आहे. साळ नदी प्रदूषित होण्याचे तेही एक प्रमुख कारण मानले जात आहे.

Sal River
कारवाईचा धसका, गोव्यात दरदिवशी 6000 पीयूसी सर्टिफिकेट जारी

मडगाव (Madgaon) नगरपालिका तसेच तिच्या कारभारावर नियंत्रण ठेवून असलेले आमदार तसेच गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळ यांच्यासाठी हे एक आव्हान ठरणार आहे.हे प्लास्टिक केवळ गटारे आणि नाल्यातून वाहून येते असे नाही, तर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अनेक जण असा प्लास्टिक कचरा आणून टाकतात. तो नंतर वाहून नदीच्या पात्रात जात असतो.

Sal River
मडगावात विनापरवाना व्यवसायांवर कारवाई होणार

साळ नदीला समांतर जाणारा वर्तुळाकार रस्ता असा कचरा (Garbage) फेकणाऱ्यांना मदतनीस ठरताना दिसत आहे. कोंब येथील भुयारी मार्ग ते कोलवा रस्त्यापर्यंतच्या भागात दिवाबत्ती नाही आणि त्याच काळोखाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हाच कचरा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नदीत (River) जात असतो. जुन्या बाजारांतील कोर्टाकडील नाला हे अशा कचऱ्याचे उदाहरण आहे. पावसात त्यातील प्लास्टिक साळ नदीमध्ये जाण्याची भीती व्यक्त केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com