Goa Panchaya: पिळगाव सरपंच निवड लांबली! गौतमी गावस यांची ऐनवेळी माघार, निवडणूक प्रक्रिया रद्द

Pilgao Sarpanch Election: सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या महिला पंचसदस्याने शेवटच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने, अखेर सरपंचपदासाठी निवडणूक घेता आली नाही.
Pilgao Sarpanch Election
Goa PanchayaDainik Goamantak
Published on
Updated on

डिचोली: पिळगाव पंचायतीच्या सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच एका नाट्यमय घडामोडीमुळे पिळगाव पंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक अखेर रद्द करण्याची वेळ निर्वाचन अधिकाऱ्यांवर आली.

सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या महिला पंचसदस्याने शेवटच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने, अखेर सरपंचपदासाठी निवडणूक घेता आली नाही. पंचायतीच्या इतिहासात प्रथमच असे राजकारण घडले आहे. दरम्यान, सरपंचपदाची निवड झाली नसल्याने या पंचायतीच्या प्रभारी सरपंचपदाचा ताबा पुन्हा एकदा उपसरपंच उमाकांत परब गावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Pilgao Sarpanch Election
Honda Panchayat: 32 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली पंचायत इमारत पाडण्याचा आदेश, सोमवारपासून कार्यवाही; होंड्यात नवे संकुल बांधले जाणार

पिळगाव पंचायतीच्या रिक्त सरपंचपदाची निवडणूक घेण्यासाठी गुरुवारी (ता.२) पंचायत मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीस उपसरपंच उमाकांत परब गावकर आणि मावळत्या सरपंच शर्मिला वालावलकर यांच्यासह मोहिनी जल्मी, गौतमी गावस, सुनील वरगावकर आणि केतन खोडगिणकर हे सहा पंचसदस्य उपस्थित होते. तर स्वप्नील फडते हे एकमेव पंचसदस्य अनुपस्थित होते.

पिळगावचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. त्यासाठी गुरुवारी निवडणूक निश्चित केली होती. निर्धारित वेळेपर्यंत सरपंचपदासाठी प्रभाग-७ मधील पंचसदस्य गौतमी गावस यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. पंचायतीच्या सूचना फलकावर त्यांनी उमेदवारी दाखल केल्याची नोटीसही लावली होती. गौतमी गावस यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जवळपास निश्चितही झाली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com