Honda Panchayat: 32 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली पंचायत इमारत पाडण्याचा आदेश, सोमवारपासून कार्यवाही; होंड्यात नवे संकुल बांधले जाणार

Honda Panchayat building demolition: सुमारे ३२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली होंडा पंचायत मालकीची व्यावसायिक इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने ती पाडण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Honda Panchayat
Honda PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: सुमारे ३२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली होंडा पंचायत मालकीची व्यावसायिक इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने ती पाडण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार वाळपई गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जूनपासून पाडकामाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पंचायत सूत्रांनी दिली.

पंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळावे या उद्देशाने १९९४-९५ दरम्यान वाळपई-होंडा मार्गालगत पंचायत मालकीच्या जागेत तीन मजली प्रशस्त इमारत उभारण्यात आली होती. पंचायत संचालनालयाच्या योजनेअंतर्गत कर्ज स्वरूपात निधी घेऊन ही इमारत बांधण्यात आली होती. तळमजल्यावर व्यावसायिक गाळे, तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर निवासी अथवा कार्यालयीन गाळ्यांचे नियोजन करण्यात आले होते.

Honda Panchayat
Goa Weather: राज्यात उष्णतेचा जोर, पावसाची प्रतीक्षा; मान्सून सक्रिय नसल्याने तापमानात सातत्याने वाढ

मात्र, बांधकामानंतर इमारतीची आवश्यक देखभाल वेळोवेळी न झाल्याने काही वर्षांतच तिची अवस्था खालावली. तळमजल्यावरील गाळ्यांमधून पंचायतीला काही प्रमाणात भाडे उत्पन्न मिळाले; परंतु वरच्या दोन मजल्यांचा अपेक्षित वापर न झाल्याने त्यातून कोणताही विशेष आर्थिक लाभ मिळू शकला नाही. परिणामी लाखो रुपये खर्चून उभारलेली ही इमारत पंचायतीसाठी अपेक्षित उत्पन्नाचे साधन ठरू शकली नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाने काही वर्षांपूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तरीही पाडकामाची कारवाई लांबणीवर पडली होती. त्यामुळे परिसरातील दुकानदार, ग्राहक तसेच शेजारील खासगी शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता इमारत पाडण्याचा निर्णय झाल्याने संभाव्य धोका टळणार आहे. पाडकामाच्या पार्श्वभूमीवर इमारतीतील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून त्यामुळे संबंधित दुकानदारांना आर्थिक फटका बसला आहे.

Honda Panchayat
Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

...अत्याधुनिक प्रकल्प!

या जागेवर आधुनिक सुविधांनी युक्त नवी इमारत उभारण्याचा संकल्प आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केला असून नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. प्रस्तावित इमारतीत तळमजल्यावर व्यावसायिक गाळे, पहिल्या मजल्यावर आरोग्य उपकेंद्र व अन्य सुविधा कक्ष, तर वरच्या मजल्यावर प्रशस्त वातानुकूलित सभागृह उभारण्याचे नियोजन असल्याचे डॉ. राणे यांनी यापूर्वी जाहीर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com