Pilerne Fire: ‘बर्जर’हटाओ; साळपे गाव बचाओ!

गावकरी आक्रमक- पेंट कंपनीविरोधात कोर्टात जनहित याचिका करणार दाखल
Pilerne Fire
Pilerne Fire Dainik Gomantak
Published on
Updated on

पिळर्ण औद्योगिक वसाहतीच्या पायथ्याशी असलेल्या साळपे गावकऱ्यांनी एकत्र येऊन ‘बर्जर बेकर कंपनी हटाओ व साळपे गाव बचाओ’चा नारा दिला. ही कंपनी लोकवस्तीतून ताबडतोब अन्यत्र स्थलांतरीत करावी, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली. (Fire in Goa Paint Factory)

त्याचप्रमाणे ‘साळपे ग्रामस्थ प्रदूषण विरोधी मोर्चा’ या समितीमार्फत या पेंट कंपनीच्या विरोधात न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करण्याची तयारी गावकऱ्यांनी दर्शविली आहे.

यापुढे साळपेवासीय आपले गाव खाली करणार नसून सदर बर्जर कंपनीलाच सदर गाव सोडून जावे लागेल, असा निर्धार या ग्रामस्थांनी या कंपनीविरोधात केला आहे.

बुधवारी सायंकाळी साळपेवासीयांची गावातील व्हॉलीबॉल मैदानावर बैठक झाली. यात रहिवाशांनी सदर बर्जर पेंट कंपनीमुळे गावासह येथील लोकांच्या आरोग्यावर झालेल्या दुष्पपरिणामांविषयी कैफियत मांडली.

Pilerne Fire
Goa Tourism: रात्री 10नंतर संगीतावर बंदी आणल्याने पर्यटनावर गंभीर परिणाम

जॉन त्रिनीनाद म्हणाले की, साळपे गावातील सर्वच विहिरी दूषित झाल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पोर्तुगीज कालीन विहिरी असून बाराही महिने पाणी आटत नाहीत. मात्र या पेंट कंपनीच्या घातक रसायनामुळे आमच्या विहिरी दूषित झाल्या.

या आगीच्या दुर्घटनेमुळे लोकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावताहेत. रहिवाशांना डोकेदुखीपासून ताप, खोकला, थंडी, श्वसन आदींचा त्रास होतोय. याला कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुठल्याही स्थिती ही पेंट कंपनी या लोकवस्तीतून अन्यत्र हलवावी. स्थानिक पंचायत मंडळाचा लोकांना पूर्ण पाठिंबा असल्याचे पंचसदस्य दिनेश मोरजकर म्हणाले.

Pilerne Fire
Goa Crime: गोव्यात 2022 मध्ये गुन्हेगारी प्रकरणांत वाढ

जीव गुदमरतोय !

गावात दिवसभर वाहणाऱ्या दूषित वाऱ्यामुळे ग्रामस्थांचा जीव गुदमरतो. त्यामुळे घराची तावदाने बंद करून लोकांना घरातच बसणे भाग पडते.

प्रशासनाने बर्जर कंपनीमुळे उद्‍भवलेल्या या समस्येवर तातडीने तोडगा काढावा,असे सांगून ज्येष्ठ नागरिक मारिया फर्नांडिस यांनी कंपनी विरोधात संताप व्यक्त केला.

2008 पासूनची मागणी

  • साळपे ग्रामस्थ प्रदूषण विरोधी मोर्चा समिती पुनरुज्जीवित करणार.

  • दुर्घटनेनंतर लोकांना सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा लागला.

  • या कंपनीविरोधात साळपेवासीयांचा 2008 पासून लढा.

  • गावातील पाणी तसेच हवा प्रदूषणाची गुणवत्ता गावकऱ्यांना प्रशासनाने सांगावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com