Goa Tourism: रात्री 10नंतर संगीतावर बंदी आणल्याने पर्यटनावर गंभीर परिणाम

10वा. ध्वनी बंदीचा प्रचार झाल्यानंतर हॉटेल्समध्ये ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. तसेच याचा थेट परिणाम गोव्याच्या पर्यटन उद्योगावर झाला आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: रात्री 10वा.नंतर संगीत बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्यापासून लग्न आणि सांस्कृतिक सोहळ्यांवर परिणाम झाले आहेत. याचा थेट परिणाम गोव्याच्या पर्यटन उद्योगावर झाला आहे.

कारण, लग्न आणि मौजमस्ती करण्यासाठी पर्यटक येतात. विषय उच्च न्यायालयात असल्याने अनेक संस्था यावर नजर ठेवून आहेत. आम्ही या समस्येवर नक्की तोडगा काढू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिले. लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते.

Goa Tourism
Goa Politics: म्हापसा नगराध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर

संंगीत वाजविण्यावर ध्वनी नियम 2000 नुसार मर्यादा आल्या आहेत. वर्षभरात केवळ 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत (12वाजेपर्यंत) संगीत वाजविण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. परंतु वेगवेगळ्या ठिकाणच्या जत्रा, उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परवानग्या घ्यावा लागतात.

अशा परवानग्या घ्यावा लागू नयेत याकरिता कायद्यात काही बदल करावे लागतील. त्याचबरोबर केंद्राकडून वेळ वाढवून घेण्याचेही प्रयत्न केले जातील, असे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री नीलेश काब्राल यांनी लेखी उत्तर दिले आहे.

Goa Tourism
Goa Crime: गोव्यात 2022 मध्ये गुन्हेगारी प्रकरणांत वाढ

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, एल्टन डिकॉस्ता, क्रूझ सिल्वा यांनी ध्वनिप्रदूषणामुळे राज्यात रात्री 10वा. संगीत बंद झाल्याने लग्न आणि सांस्कृतिक सोहळ्यांवर झालेल्या परिणामांसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. लग्नसोहळ्यांवर याचा परिणाम झाला आहे.

10वा. ध्वनी बंदीचा प्रचार झाल्यानंतर हॉटेल्समध्ये ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी साधनसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

पर्यटनावर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा भिवपाची गरज ना असे म्हणतात तेव्हा तेव्हा लोकांना भीती वाटते, यावर चितपाची गरज आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com