Goa Crime: गोव्यात 2022 मध्ये गुन्हेगारी प्रकरणांत वाढ

2022 मध्ये खून, बलात्कार व रस्ता अपघातांत वाढ झाली असल्याची माहिती विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.
CM Pramod Sawant |Goa Government
CM Pramod Sawant |Goa GovernmentDainik Gomantak

Goa Crime: गेल्या पाच वर्षांत राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये खून, बलात्कार व रस्ता अपघातांत वाढ झाली असल्याची माहिती विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.

गेल्या वर्षी 44 खून, 75 बलात्कार तसेच 256 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारकडून राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात यश आलेले नाही. पोलिस तपासची टक्केवारी इतरांच्या तुलनेत गोव्यात सर्वाधिक असली तरी गुन्हे रोखण्यास पोलिस कमी पडत आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील गेल्या पाच वर्षांतील गुन्हेगारीसंदर्भातच्या आढाव्यावर प्रश्‍न विचारला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध केली आहे.

या माहितीनुसार, 2018 ते 2022 या काळात राज्यात खुनाची प्रकरणे वाढतच आली आहेत. 2018 मध्ये 29 खून प्रकरणे झाली होती ती 2022 मध्ये 44 वर पोहोचली आहेत. यावरून प्रत्येक महिन्याला राज्यात सरासरी 4 खुनांची नोंद होत आहे.

CM Pramod Sawant |Goa Government
Kalasa Project: कर्नाटकला वन परवानगी रोखण्यासाठी गोवा सरकारचे प्रयत्न

राज्यात रस्ता अपघात ही समस्या अजूनही सरकारला सोडविता आलेली नाही. यावर सरकारने पोलिस, पीडब्ल्यूडी तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना एकत्रित तोडगा काढण्याचे निर्देश देऊनही त्यावर अजून काहीच झालेले नाही.

2018 मध्ये 243 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. 2022 मध्ये हे मृत्यूचे प्रमाण 256 वर गेले आहे. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलांचा वाहन चालविताना मृत्यू झाल्यानंतर सरकारने मोहीम उघडून मुलांच्या पालकांना जबाबदार धरले जाईल असे ठरविले होते. मात्र, ती मोहीमच शिथील झाली आहे.

CM Pramod Sawant |Goa Government
Goa Politics: म्हापसा नगराध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर

पाच वर्षांत 7,251 नैसर्गिक मृत्यू

राज्यात गेल्या पाच वर्षांत 7,251 नैसर्गिक मृत्यूंची नोंद आहे. त्यामध्ये दीर्घ आजाराने मृत्यू, आत्महत्या करणे, बुडून मृत्यू होणे किंवा उंचावरून खाली पडणे, अशा प्रकरणांचा समावेश आहे. 2018 मध्ये ही संख्या 1,483 होती ती 2022 मध्ये 1469 वर गेली आहे. दर महिन्याला सरासरी 122 नैसर्गिक मृत्यूंची नोंद होत आहे.

गेल्या पाच वर्षांत प्रकरणे वाढली

गेल्या पाच वर्षांत राज्यातील बलात्काराची प्रकरणे वाढली आहेत. 2018 मध्ये बलात्कारासंदर्भात 61 गुन्हे नोंद झाले होते. 2022 मध्ये ही संख्या 75 वर गेली आहे. सरासरी गोव्यात दर महिन्याला बलात्काराच्या 7 घटना घडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com