लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी केली मैत्री, लैंगिक अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; वडिल, मुलाचा फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Goa Crime News: पोलिसांनी अटकपूर्व जामिनासाठी विरोध केला असून त्यांनी न्यायालयाला सांगितले कि, सुरुवातीला रायगड जिल्ह्यात ''शून्य एफआयआर'' नोंदवली गेली होती आणि नंतर कळंगुट पोलीस ठाण्यात ती वर्ग करण्यात आली.
Court Order | Goa Crime News
Margao Court OrderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येथील पॉक्सो न्यायालयाने २९ वर्षीय युवकाचा आणि त्याच्या वृद्ध पालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. विवाह करण्याचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे, हल्ला करणे, धमकी देणे आणि तक्रारदार महिला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांमुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने केलेल्या आरोपावरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अटकपूर्व जामिनासाठी विरोध केला असून त्यांनी न्यायालयाला सांगितले कि, सुरुवातीला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ''शून्य एफआयआर'' नोंदवली गेली होती आणि नंतर कळंगुट पोलीस ठाण्यात ती वर्ग करण्यात आली.

Court Order | Goa Crime News
Goa Cyber Crime: काळजी घ्या! गोव्यात महिन्‍याला 5 सायबर गुन्हे, 267 गुन्‍ह्यांची नोंद; गृहमंत्रालयाची आकडेवारी उघड

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, युवकाने तक्रारदार महिलेशी मैत्री केली आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये, तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला कळंगुट येथे आणले. यावेळी युवकाने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर, त्याने लग्नाच्या खोट्या आश्वासनावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

Court Order | Goa Crime News
Goa Crime: 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण! सहाजणांविरोधात गुन्हा, दोघा संशयितांना सशर्त जामीन

हे संबंध महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावीही सुरू राहिले, असा आरोप महिलेने केला आहे.पालकांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतेही विशिष्ट आरोप नाहीत, ते वेगळे राहतात आणि मुलाच्या वैयक्तिक जीवनाशी कोणताही संबंध नाही, असा युक्तिवाद पालकांकडून करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com