Goa Cyber Crime: काळजी घ्या! गोव्यात महिन्‍याला 5 सायबर गुन्हे, 267 गुन्‍ह्यांची नोंद; गृहमंत्रालयाची आकडेवारी उघड

Cyber Crime in Goa: राज्‍यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्‍या काळात २६७ सायबर गुन्‍हे नोंद झाले. २०१९ मध्‍ये अवघे १५ गुन्‍हे नोंद झाले होते. त्‍यानंतर २०२२ पर्यंत त्‍यात वाढ होत गेली.
Online Scam News
Pune Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्‍या काळात २६७ सायबर गुन्‍हे नोंद झाले. २०१९ मध्‍ये अवघे १५ गुन्‍हे नोंद झाले होते. त्‍यानंतर २०२२ पर्यंत त्‍यात वाढ होत गेली. २०२२ च्‍या २०२३ मध्‍ये त्‍यात काहीअंशी घट झाल्‍याचे केंद्रीय गृहराज्‍यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातील आकडेवारीतून दिसून येते. यातून राज्‍यात महिन्‍याला सरासरी अशाप्रकारच्‍या पाच गुन्‍ह्यांची नोंद होत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

२०१९ पासून गोव्‍यासह सर्वच राज्‍यांतील सायबर गुन्‍हेगारीत वाढ झाली. राज्‍यात २०१९ मध्‍ये १५ गुन्‍हे नोंद झालेले होते. २०२० मध्‍ये हा आकडा ४० झाला. त्‍यानंतर २०२१ मध्‍ये त्‍यात घट होऊन हा आकडा ३६ पर्यंत आला होता. पण, २०२२ मध्‍ये त्‍यात मोठी वाढ होऊन हा आकडा ९० झाला.

२०२३ मध्‍ये त्‍यात काहीअंशी घट होऊन यावर्षी ८६ गुन्‍हे नोंद झाल्‍याचे मंत्री बंदी संजय कुमार यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते. संपूर्ण देशपातळीचा विचार केल्‍यास २०१९ मध्‍ये अशाप्रकारचे ४४,७३५ गुन्‍हे नोंद झाले होते.

Online Scam News
Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

२०२० मध्‍ये ते ५०,०३५ झाले. २०२१ मध्‍ये त्‍यात वाढ होऊन ते ५२,९७४ झाले. २०२२ मध्‍ये त्‍यात पुन्‍हा वाढ होऊन ते ६५,८९३ झाले. त्‍यानंतर २०२३ मध्‍ये त्‍यात आणखी वाढ झाली. यावर्षी देशभरात ८६,४२० सायबर गुन्‍ह्यांची नोंद झालेली होती, असेही आकडेवारीतून दिसते.

Online Scam News
Cyber Attack: 'सायबर' हल्ल्याचा धोका वाढला! गुगलची 250 कोटी जीमेल यूजर्संना तातडीची चेतावणी जारी; पासवर्ड बदलण्याची केली सूचना

राज्‍यात नोंद झालेले सायबर गुन्‍हे

वर्ष गुन्‍हे

२०१९ १५

२०२० ४०

२०२१ ३६

२०२२ ९०

२०२३ ८६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com