Vedanta News
Vedanta NewsDainik Gomantak

Vedanta News: 'सेझा’ कामगारांची सतावणूक सुुरू

Vedanta News: अजय प्रभुगावकर: जादा रक्कम परत करण्याची नोटीस
Published on

Vedanta News: कपात केल्यानंतरही सेझा (वेदांता) कंपनीकडून अजूनही कामगारांची सतावणूक सुरू आहे. कपात करताना कामगारांच्या खात्यात जमा केलेली जादा रक्कम परत करा, अशी नोटीस कंपनीने कामगारांना पाठवली आहे.

Vedanta News
Goa Politics: भाजपकडून गोमंतकीयांवरच अन्याय

हा प्रकार म्हणजे आधीच गलितगात्र झालेल्या कामगारांच्या भावनांशी खेळ आहे, अशी टीका सेझा कामगारांचे सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर यांनी केली आहे. सरकारकडून खाण कंपन्यांचे लाड होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

शुक्रवारी डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, सचिव किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर, महेश होबळे, पांडुरंग परब, अनिल सालेलकर, दीपक पोपकर आणि बाबुसो गावकर उपस्थित होते.

Vedanta News
कळंगुट-बागा किनाऱ्यावरील अवैध मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप; कारवाईची मागणी

पूर्वाश्रमीच्या सेझाच्या कामगारांची कपात करताना या कामगारांच्या बँक खात्यात वेदांता कंपनीने रक्कम जमा केली होती. ही रक्कम अतिरिक्त असल्याची नोटीस कंपनीने आता कामगारांना पाठवली असून, अतिरिक्त रक्कम परत करा.

असे कळविले आहे. कामगारांच्या सेटलमेंटसंबंधी स्टेटमेंट मागितलाय, तर तो देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे, असे ॲड. प्रभुगावकर यांनी सांगितले.

घोटाळ्याची शक्यता

खाण कंपन्यांकडून येणे असलेली 271 कोटी रुपये थकबाकी हा जनतेचा पैसा आहे. ही थकबाकी सरकारने वसूल करावी. ही मागणी रास्त असून, थकबाकी असतानाही सरकारने वेदांता कंपनीला खाण ब्लॉक लिलावात सहभागी कसे करुन घेतले? असा प्रश्न ॲड. अजय प्रभुगावकर यांनी उपस्थित केला.

हा प्रकार म्हणजे खाण कंपनीचे लाड असून, यात नक्कीच काळेबेरे असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. सरकारने खाण कंपन्यांकडून थकबाकी वसुल करावी. अन्यथा भविष्यात मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com