Illegal Massage Parlor
Illegal Massage ParlorDainik Gomantak

कळंगुट-बागा किनाऱ्यावरील अवैध मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप; कारवाईची मागणी

रस्त्याच्या कडेला उभे असलेले दलाल पार्लरमध्ये क्रॉस मेसेज देऊन ग्राहकांना खुणावत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
Published on

Illegal Massage Parlor: कळंगुट-बागा किनाऱ्यावर अवैध मसाज पार्लरद्वारे पर्यटकांची लूट अजूनही सुरूच आहे. त्यातच या पार्लरमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे संतप्त रहिवाशांनी पार्लर बंद केले.

रस्त्याच्या कडेला उभे असलेले दलाल पार्लरमध्ये क्रॉस मसाज देण्याच्या बहाण्याने ग्राहकांना खुणावत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Illegal Massage Parlor
Ferry Boat Fare: भाजप सरकारला अखेर माघार घ्यावी लागली; फेरीबोट शुक्लावरून आलेमावांचा टोला

हा सर्व चाललेला प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी मिळून पार्लरवर मोर्चा काढला आणि जागा बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर मालकाशी संवाद साधल्यानंतर मसाज पार्लरही पंचायतीच्या परवानगीशिवाय सुरू असल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पा चालवण्यासाठी मालकाकडे कोणतीही परवानगी नाही.

सदर पार्लर कोणत्याही परवानगी शिवाय अंधारात आणि अलिप्तपणे कार्यरत आहे. या घटनेने दलालांना काम देणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई केली जाईल, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भुवया उंचावल्या आहेत. अशा आस्थापनांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com