Goa Taxi Operator Protest: लेखी हमी मिळाली, सहा दिवसांनंतर टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन मागे

Pernem Taxi Operator Protest: पाच मागण्या मान्य झाल्याची लेखी मिळत नाही तोवर मागे न हटण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
Goa Taxi Operator Protest: लेखी हमी मिळाली, सहा दिवसांनंतर टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन मागे
Taxi Operators in Protest At Pernem GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi Operator Protest

पेडणे: मागण्या मान्य झाल्याची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिक घेतलेल्या टॅक्सी आंदोलकांनी सहाव्या दिवशी हमी मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टॅक्सी आंदोलकांच्या सहापैकी पाच मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पेडण्यात आंदोलन करणाऱ्या टॅक्सी आंदोलकांनी सोमवारी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर आंदोलकांच्या पाच मागण्या मान्य करण्यात आल्या. पण, मोपावरील गोवा माईल्स काउंटर बंद करण्याची मागणी मान्य झाली नाही.

पाच मागण्या मान्य झाल्याची लेखी मिळत नाही तोवर मागे न हटण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. अखेर सहाव्या दिवशी त्यांना लेखी हमी मिळाली असून, त्यांनी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Goa Taxi Operator Protest: लेखी हमी मिळाली, सहा दिवसांनंतर टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन मागे
सहापैकी पाच मागण्या मान्य; गोवा माईल्सचा काउंटर कायम; टॅक्सी व्यावसायिकांची राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारी

पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी राष्ट्रीय महामार्ग ते विमानतळ या नव्या उड्डाणपूल रस्त्यावरील टोलमध्ये टॅक्सी व्यावसायिकांना सवलत देण्याची मागणी केली होती. यासह विमानतळाकडे जाणारा जुना रस्ता स्थानिक टॅक्सीवाल्यांना वापरू द्यावा आणि विमानतळावर बेकायदेशीरपणे कार भाड्याने देण्याचे व्यवहार बंद करावे अशी मागणी केली होती. या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

पण, मोपा विमानतळावरील गोवा माईल्सचा काउंटर हटवा ही मागणी मान्य केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com