Pravin Arlekar : विकासात्मक चर्चेच्या बैठकीवर आमदार आर्लेकरांचा बहिष्कार

चर्चांना उधाण : तोर्से जिल्हा पंचायत सदस्या सीमा खडपे यांचा आरोप
Vilas Gadgil and District Panchayat Member Seema Khadpe while guiding the meeting
Vilas Gadgil and District Panchayat Member Seema Khadpe while guiding the meetingDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे : जिल्हा पंचायतच्या माध्यमातून पंचायत क्षेत्रातील सर्वांगीण विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी येणाऱ्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी तोर्से जिल्हा पंचायत क्षेत्रातील ८ ग्रामपंचायतींना जि. पं. सदस्या सीमा खडपे यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर गैरहजर राहिल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

हसापूर येथील श्री सातेरी सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हसापूर परिसरातील विविध संस्थांच्या पदाधिकारी व सदस्य दिपाली धावरे, सावित्री नाईक, रक्षिता शेटकर, विशाली गवस, संजीवनी परब, जानकी परब, शिवाली नाईक, मुस्कान नाईक, रूपाली मळिक, ज्योत्स्ना मळिक, संगीता कालेकर आदी उपस्थित होत्या.

जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून उपस्थित असलेले विलास गाडगीळ यांनी उपस्थित सदस्यांच्या समस्या जाणून घेत स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Vilas Gadgil and District Panchayat Member Seema Khadpe while guiding the meeting
Ambedkar Statue In Pernem : ..तर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण करणार - तुकाराम तांबोसकर

गावच्या विकासाला खिळ

कार्यक्रमानंतर सीमा खडपे म्हणाल्या, की गावच्या विकासासाठी ‘व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करून त्या माध्यमातून गावचा विकास साधणे शक्य आहे. त्यासाठी पंचायत पातळीवरील ही समिती निवडली जाते. मात्र, या समितीतील सदस्यांकडून या बैठकीत बहिष्कार घालण्यात आला. कोणाच्या तरी सांगण्यावरून लोकप्रतिनिधींनी बैठकीत बहिष्कार घालणे म्हणजे गावच्या विकासाला खिळ घालणे होय.

Vilas Gadgil and District Panchayat Member Seema Khadpe while guiding the meeting
Development League Football : एफसी गोवा, वेळसाव मुख्य फेरीसाठी पात्र

आमदारांची अनुपस्थिती : कार्यक्रमाला स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, त्यांचे समर्थक सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य तसेच ज्या चांदेल गावात ही बैठक आयोजित केली होती, त्या गावचे सरपंच तथा पेडणे भाजपचे गट मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस हे देखील उपस्थित नव्हते. याप्रकरणी आर्लेकर यांची बाजू समजून घेण्यासाठी मोबाईल फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Vilas Gadgil and District Panchayat Member Seema Khadpe while guiding the meeting
Pernem: सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारणार का? परदेशी पर्यटकांवर हल्ल्यांमुळे पेडणेतील व्यापाऱ्यांना चिंता...

हा माझा वैयक्तिक कार्यक्रम नसून राज्य सरकारच्या जिल्हा पंचायत पातळीवरील कार्यक्रम आहे. शिवाय मी सत्ताधारी भाजपची सदस्य असून या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी पंचायत मंडळाला पत्र पाठविण्यात आले होते. असे असताना कोणाच्या सांगण्यावरून हा बहिष्कार घालण्यात आला हे माहित नाही. पक्ष पातळीवरील आपण हा विषय नेणार.

- सीमा खडपे, जिल्हा पंचायत सदस्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com