Goa Tourism |Foreign tourist
Goa Tourism |Foreign touristDainik Gomantak

Pernem: सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारणार का? परदेशी पर्यटकांवर हल्ल्यांमुळे पेडणेतील व्यापाऱ्यांना चिंता...

स्थानिकांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होण्याची भिती
Published on

Pernem businessmen on attack on tourist: पेडणेच्या किनारी भागात पर्यटकांवर हल्ले वाढत असल्याने गोव्याच्या पर्यटन उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होऊन पर्यटकांची संख्या कमी होण्याची भीती स्थानिक व्यापाऱ्यांना वाटते.

अशा घटनांमुळे पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची प्रतिमा मलिन होते आणि त्याचा परिणाम स्थानिक व्यवसायांवर होतो. यामुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारली जाऊ शकते, असा स्थानिकांचा दावा आहे.

Goa Tourism |Foreign tourist
Anjuna Crime : हणजुणेत महिलेचा विनयभंग; शिवीगाळ आणि मारहाणही...

स्थानिक व्यावसायिकांनी म्हटले आहे की, पर्यटकांवर हल्ले आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी बहुतांश घटनांमध्ये तत्परतेने कारवाई केली; तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत.

परंतु, बेकायदेशीर धंदे आणि इतर राज्यांतील कामगारांच्या प्रवेशामुळे राज्याची सामाजिक बांधणी बिघडली आहे. अशा घटना टाळण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

परदेशी पर्यटक तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. कारण त्यांना न्यायालयात पाठपुरावा करणे जिकीरीचे वाटते. त्याचा फायदा आरोपींना होतो. त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळावा. यासाठी परदेशी तसेच स्थानिक पर्यटकांनीही तक्रारी दाखल केल्या आहेत.

तसेच खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

Goa Tourism |Foreign tourist
Goa Child Pregnancies: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ; महिन्याला 'इतकी' प्रकरणे उघड

बेकायदेशीर कामांवर अंकुश लावला पाहिजे. पण कायदेशीर व्यवसायात दोष शोधला जात आहे. किनारपट्टीवर रेव्ह पार्ट्या होतात, तिथे ड्रग्ज विकले जाते. अशा कारवायांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com