Morjim News : एका लॅपटॉपवर ‘आधार’ त्रासदायक! पेडणेतील नागरिकांची गैरसोय

पेडणेतील नागरिकांची गैरसोय : आमदारांच्या भेटीनंतर स्थितीत सुधारणा नाही
Inconvenience to citizens
Inconvenience to citizensGomantak Digital Team
Published on
Updated on

Morjim News : पेडणे येथील बालकल्याण खात्याच्या कार्यालयात आधार कार्ड अद्ययावत करण्याचे केंद्र आहे, परंतु या केंद्रात एकाच लॅपटॉपवर हे काम चालते. त्यामुळे नागरिकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने गैरसोय होत आहे. दरम्यान, या केंद्रातील स्थितीसंदर्भात आमदार प्रवीण आर्लेकर यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी भेट देवून तिथल्या अजब कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता, परंतु त्यानंतर सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कामकाज ‘जैसे थे’ चालू असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात आहे.

या कार्यालयाच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर केवळ 30 जणांनाच आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी टोकण दिले जातात. जर ते मिळाले नाही, तर नागरिकांना पुढच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. या केंद्रात आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीनच दिवस आणि तेही एकाच लॅपटॉपवर हे काम चालते. टोकण मिळाल्यावर नंबर लागेपर्यंत दूरवरून आलेल्या लोकांना सायंकाळपर्यंत कार्यालय परिसरात दिवस घालवावा लागतो. त्यामुळे आधारकार्ड बनविण्याची प्रक्रिया म्हणजे लोकांना डोकेदुखी ठरत आहे.

Inconvenience to citizens
Morjim constructions : समुद्रकिनाऱ्यांना संरक्षण कोण देणार?

पेडणे येथील बालकल्याण खात्याच्या अडगळीत असलेल्या या कार्यालयाच्या बाहेर सकाळी 7.30 पासून लहानांपासून मोठ्यांच्या रांगा लागतात. लहान मुलांचे काम असेल, तर पालकांची तारांबळ उडते. हे काम संपेपर्यंत सायंकाळचे 4 वाजतात, असे आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी आलेल्या कासारवर्णे - पेडणे येथील एका महिलेने सांगितले.

आठवड्यातून तीनच दिवस सुविधा उपलब्ध गावोगावी शिबिरे

पेडणे तालुक्यासाठी आधार कार्ड अद्ययावत बनविण्यासाठी हे एकच कार्यालय, एकच लॅपटॉप व एकच कर्मचारी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सरकारने जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गावोगावी शिबिहे आयोजित करून आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Inconvenience to citizens
Morjim : बेकायदा घरे, दुकानांना २ टक्के टॅक्स लावणार

एकच कर्मचारी!

आधारकार्ड बनवून देण्यासाठी एक लॅपटॉप, प्रिंटर व अन्य सामग्री दिली गेली आहे. केवळ एक कर्मचारी आधारकार्ड बनविण्यास आलेल्यांची सर्व माहिती, कागदपत्रे पडताळून, हातांचे ठसे, बोटांचे ठसे, बुब्बुळ यांचे स्कॅन करून त्याची माहिती संकलित करून ठेवणे यात साधारण 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. असे एकूण 30 जणांचे काम होईपर्यंत सायंकाळचे 4 ते 5 वाजतात. तोपर्यंत लोकांना ताटकळत राहावे लागते.

तिसऱ्या मजल्यावर अडगळीत कार्यालय :

हे कार्यालय तिसऱ्या मजल्यावरील अडगळीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सुमारे 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर जर टोकण मिळाला नाही, तर घरी परतावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. पेडणे तालुक्यातील नागरिकांना पहाटे लवकर उठून कार्यालय गाठावे लागते. साधारण तळमजल्यापासूनच रांग लागलेली असते. या कार्यालयात बसायचीही सोय नसल्याने नागरिकांना असह्य उकाडा सहन करत पायऱ्यांवरच बसावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com